मुंबई Hardik Pandya Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आज 11 ऑक्टोबर रोजी 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. 31 वर्षीय पांड्या आज भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा महत्त्वाचा भाग आहे. तो डेथ ओव्हर्समध्येही गोलंदाजी करतो. T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर हरलेला सामना जिंकवून दिला. आधी त्यानं धोकादायक दिसणाऱ्या हेनरिक क्लासेनला बाद करुन ही भागीदारी तोडली आणि नंतर शेवटच्या षटकात 16 धावा वाचवून त्यानं 17 वर्षांनंतर भारताला T20 विश्वचषक जिंकून दिला. पांड्यानं 3 षटकांत अवघ्या 20 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले होते.
- T20I World Cup winner
— Johns. (@CricCrazyJohns) October 11, 2024
- IPL winner as Captain
- Asia Cup winner
- Former No. 1 all-rounder in T20I
- Fifty in T20I WC Semi Final
- Fifty in CT final
- POTM vs PAK in Asia Cup
HAPPY BIRTHDAY WISHES TO THE MAN FOR BIG MOMENTS, HARDIK PANDYA 🇮🇳pic.twitter.com/wpJBTm7fQb
सध्या बांगलादेशविरुद्ध हार्दिक मैदानात : सध्या हार्दिक बांगलादेशसोबत खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत खेळताना दिसत आहे. ज्यात पांड्या आपल्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अप्रतिम कामगिरी करत आहे. पहिल्या सामन्यात हार्दिकनं खेळलेला नो लुक शॉट आणि दुसऱ्या सामन्यात घेतलेला शानदार झेल सध्या चांगलाच चर्चेत आहे.
HARDIK PANDYA STUNNER FROM A DIFFERENT ANGLE. 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2024
- The amount of ground he covered was sensational. 🫡pic.twitter.com/vo2vsziz2D
IPL 2024 मध्ये झाला होता ट्रोल :
IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवण्यात आलं. यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले. या संपूर्ण हंगामात हार्दिक पांड्या बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत फ्लॉप ठरला, त्यामुळं हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. IPL च्या संपूर्ण हंगामात हार्दिकला मैदानापासून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं.
- T20 World Cup winner. 🏆
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2024
- IPL winning captain. 🎖️
- 87 T20i wickets.
- 76 (43) in the 2017 CT FINAL.
- 87 (90) Vs Pakistan in Asia Cup.
- 63 (33) Vs England in the T20WC Semis.
HAPPY BIRTHDAY TO THE CLUTCH GOD OF TEAM INDIA - HARDIK PANDYA. 🇮🇳 pic.twitter.com/s1TJACeDxr
T20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार पुनरागमन :
IPL 2024 चा वाईट काळ विसरुन हार्दिक पांड्यानं T20 विश्वचषक 2024 मध्ये शानदार पुनरागमन केलं. IPL 2024 नंतर, T20 विश्वचषकासाठी भारतीय संघामध्ये हार्दिकची निवड होणार नाही, असं वाटत होतं. परंतु निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सर्वात तेजस्वी अष्टपैलू खेळाडूवर विश्वास व्यक्त केला. हार्दिक पांड्यानंही निवडकर्त्यांच्या विश्वासावर खरा उतरला. हार्दिकनं संपूर्ण T20 विश्वचषक 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. विश्वचषकाच्या फायनलमध्ये गोलंदाजी करत भारतीय संघाला विश्वविजेता बनवण्यात हार्दिकनं ज्या प्रकारे भूमिका बजावली ती कोणीही विसरु शकत नाही.
Happy birthday, Mr. SWAGGER...!!! 🥶 pic.twitter.com/8v4F3OBNK2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2024
दोनदा लग्न करुनही सिंगल :
हार्दिक पांड्यानं बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी दोनदा लग्न केलं. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान दोघांनी पहिल्यांदा लग्न केलं. यानंतर हार्दिक आणि नताशा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये पुन्हा एकमेकांशी लग्न केलं, परंतु त्यांचं लग्न 4 वर्षांपेक्षा जास्त टिकू शकलं नाही. याच वर्षी हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा आहे, त्याचं नाव अगस्त्य पांड्या आहे. घटस्फोटानंतर अगस्त्य नताशासोबत राहतो.
HARDIK PANDYA STUNNER FROM A DIFFERENT ANGLE. 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2024
- The amount of ground he covered was sensational. 🫡pic.twitter.com/vo2vsziz2D
वर्षाला कमावतो कोट्यवधी रुपये :
हार्दिकला BCCI कडून वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. याशिवाय तो IPL मध्ये खेळूनही भरपूर कमाई करतो. त्याला एकदिवसीय सामन्यांत 20 लाख रुपये, कसोटी सामन्यांत 30 लाख रुपये आणि T20 सामन्यात सुमारे 15 लाख रुपये मिळतात. याशिवाय भारतीय संघासोबत वार्षिक केंद्रीय करारही आहे. IPL च्या शेवटच्या मोसमातच त्यानं मुंबई इंडियन्ससोबत एका मोसमासाठी 15 कोटी रुपयांचा करार केला होता आणि त्याला कर्णधारही बनवण्यात आलं होतं.
हार्दिकची कसोटी कारकीर्द कशी :
हार्दिक पांड्यानं 11 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 532 धावा केल्या आहेत आणि 17 विकेट्सही घेतल्या आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 108 होती. मात्र, हार्दिक अनेक दिवसांपासून कसोटी क्रिकेट खेळत नाही. त्याला दुखापतीपासून वाचवण्यासाठी BCCI ला हार्दिकबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागले, ज्यामुळं भारतीय संघाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप फायदा झाला.
- T20I World Cup winner
— Johns. (@CricCrazyJohns) October 11, 2024
- IPL winner as Captain
- Asia Cup winner
- Former No. 1 all-rounder in T20I
- Fifty in T20I WC Semi Final
- Fifty in CT final
- POTM vs PAK in Asia Cup
HAPPY BIRTHDAY WISHES TO THE MAN FOR BIG MOMENTS, HARDIK PANDYA 🇮🇳pic.twitter.com/wpJBTm7fQb
हार्दिकची व्हाईट बॉल कारकीर्द कशी :
हार्दिकनं 81 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1769 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 84 विकेट आहेत. 104 T20I सामन्यांत 1594 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये पांड्यानं 87 विकेट्स घेतल्या आहेत. जर आपण आयपीएलबद्दल बोललो तर त्यानं 137 सामन्यांमध्ये 2525 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजी करताना 64 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा :