मुंबई Happy Birthday Chris Gayle : वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू आणि क्रिकेटमध्ये 'युनिव्हर्स बॉस' म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल आज त्याचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. ख्रिस गेलला समोर पाहून चांगले गोलंदाज आपली लाईन आणि लेन्थ विसरायचे. वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज फलंदाजाचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी किंग्स्टन, जमैका इथं झाला. ख्रिस गेलनं वेस्ट इंडिजसाठी 483 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्यानं संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.
HAPPY BIRTHDAY, CHRIS GAYLE. 🐐
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 20, 2024
- Champions Trophy winner.
- Orange Cap winner twice.
- 10,480 ODI runs.
- 7,215 runs.
- 4,965 IPL runs.
- 42 international 💯.
- 2 triple 💯 in Tests.
- A double 💯 in ODIs.
- THE GREATEST EVER ENTERTAINER...!!!pic.twitter.com/sHci0KaQcR
ख्रिस गेलनं क्रिकेटवर सोडली छाप : ख्रिस गेलनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सर्व फॉरमॅटमध्ये अनेक विक्रम केले. ज्यामध्ये कसोटीतील त्रिशतक, वनडेतील द्विशतक आणि T20 मधील अनेक शतकांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानावर गेलची कामगिरी अगणित आहे. ख्रिस गेल हा वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. T20 फॉरमॅटबद्दल बोलायचं झालं तर गेलनं या फॉरमॅटमध्ये 14,000 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 1,000 हून अधिक षटकार ठोकले आहेत. जगातील अशी कोणतीही T20 लीग नसेल ज्यात गेल खेळला नाही.
Here's wishing the RCB Hall of Famer, Chris Gayle, a very Happy Birthday! 🥳 🎂
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 21, 2024
Thank you for the unforgettable memories, Universe Boss! 🫡#PlayBold #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/nKc1rip9mJ
1000 हून अधिक षटकार : T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलनं वेगवेगळ्या लीग आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये जवळपास 15 हजार धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 1000 हून अधिक षटकार आहेत, तर टी-20मध्ये 22 शतकं आहेत. ख्रिस गेलनं आयपीएलमध्येही अनेक विक्रमी खेळी केल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात द्विशतक : याशिवाय, एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकात द्विशतक झळकावणारा तो पहिला फलंदाज होता. ख्रिस गेलनं विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची शानदार खेळी खेळून ही कामगिरी केली होती. 1999 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गेलनं 103 कसोटी, 301 एकदिवसीय आणि 79 टी-20 सामने खेळून सर्व फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यानं 19,593 धावा केल्या, ज्यात 42 शतकांचा समावेश आहे.
उदरनिर्वाह करण्यासाठी आई विकायची चिप्स : ख्रिस गेलची गोष्ट गरिबीतून उठून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू बनण्याची आहे. ख्रिस गेलला त्याच्या सुरुवातीच्या काळात खूप आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करुन विकायच्या होत्या. या काळात तो एका झोपडीत राहत असे. ख्रिस गेलनं एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील या संघर्षाची कहाणी सांगितली होती. ख्रिस गेलच्या म्हणण्यानुसार, त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चिप्स विकायची.
हेही वाचा :