ETV Bharat / sports

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये व्हीलचेअर बास्केटबॉलच्या सन्मानासाठी गूगलचं खास 'डूडल' - Paris Paralympics 2024

Paris Paralympics 2024 : गूगलच्या नवीनतम डूडलने गुरुवारी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळाचा उत्सव साजरा केला. यामध्ये एक हिरवा पक्षी हिरव्या जाळ्यात बास्केटबॉल टाकताना दिसत आहे.

Paris Paralympics 2024
गूगलचं खास 'डूडल' (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 30, 2024, 2:40 PM IST

Updated : Aug 31, 2024, 12:25 PM IST

नवी दिल्ली Paris Paralympics 2024 : गूगलनं शुक्रवारी व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळाचं अनावरण करत महत्त्वाचे जागतिक कार्यक्रम साजरे करण्याची आणि अभिनव डूडलद्वारे सामाजिक संदेश देण्याची परंपरा सुरु ठेवली. डूडलमध्ये वापरण्यात आलेल्या प्रतिमेमध्ये पॅरालिम्पिक खेळात एक पक्षी स्लॅम डंक करताना दाखवलं आहे, असं दिसतं की पक्षानं बास्केटबॉल नेटमध्ये टाकला. गूगल नेहमीचं असे डुडल तयार करत असतो.

का सुरु करण्यात आला व्हीलचेअर बास्केटबॉल : खेळांच्या पहिल्या दिवशी यूएसए संघानं स्पेनवर 66-56 असा विजय मिळवला. स्पेनचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अलाबामा पॅरालिम्पियन इग्नासिओ ओर्टेगा लाफुएन्टेनं 17 गुण मिळवून चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेल्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी व्हीलचेअर बास्केटबॉल सुरु करण्यात आला. इंटरनॅशनल व्हीलचेअर बास्केटबॉल फेडरेशनच्या मते, हा खेळ पहिल्यांदा 1945 मध्ये युनायटेड स्टेट्समधील दोन हॉस्पिटलमध्ये खेळला गेला. गूगल डूडलमध्ये व्हीलचेअर बास्केटबॉलचं चित्रण आहे आणि त्यावर क्लिक करुन वापरकर्ते सध्या सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमधील या खेळाचं वेळापत्रक पाहू शकतात.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये व्हीलचेअर बास्केटबॉल : 1960 च्या रोम पॅरालिम्पिकमध्ये व्हीलचेअर बास्केटबॉलचा प्रथमच पॅरालिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला. स्पर्धेत खेळल्या गेलेल्या दोन्ही बास्केटबॉल स्पर्धेत यूएसएनं सुवर्णपदकं जिंकली. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये, 8 पुरुष आणि महिला संघ सहभागी होतील, जे मागील आवृत्तीतील 12 संघांच्या संख्येपेक्षा लक्षणीय कमी आहे. इव्हेंटसाठी पात्रता प्रादेशिक चॅम्पियनशिपद्वारे प्राप्त झाली. कारण प्रत्येक विभागातील शीर्ष चार देशांनी बर्थ मिळवले. प्रादेशिक चॅम्पियनशिपमध्ये संधी गमावलेल्या संघांसाठी रिपेचेज स्पर्धा ही आणखी एक संधी होती.

हेही वाचा :

  1. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठं पाहाता येईलं? वाचा एका क्लिकवर - Pak vs Ban 2nd Test live streaming
  2. एक-दोन नव्हे तर 13 वेळा डोक्याला लागला चेंडू; 26 वर्षाय खेळाडूला घ्यायला लावली सक्तीची निवृत्ती? - Will Pucovski
  3. ICC क्रमवारीत मोठे बदल... विराट कोहली, यशस्वी जैस्वालचा न खेळताच मोठा फायदा तर बाबर आझमचं खेळूनही नुकसान - ICC Rankings 2024

Last Updated : Aug 31, 2024, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.