ETV Bharat / sports

लाईव्ह क्रिकेट सामन्यात मैदानावरच खेळाडूंमध्ये जोरदार भांडण, लाथा-बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण; पाहा व्हिडिओ - Fighting in Live Cricket Match - FIGHTING IN LIVE CRICKET MATCH

Fighting in Live Cricket Match : सोशल मीडियावर क्रिकेट सामन्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खेळाडू मैदानावरच एकमेकांना लाथा-बुक्क्या मारताना दिसत आहेत.

Fighting in Live Cricket Match
प्रतिकात्मक छायाचित्र (Getty Images)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 20, 2024, 12:39 PM IST

Updated : Sep 20, 2024, 2:42 PM IST

दुबई Fighting in Live Cricket Match : क्रिकेटला नेहमीच जेंटमॅनचा खेळ म्हटलं जातं. मात्र क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडूंमध्ये जोरदार वाद होत असतात. खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध होणं सामान्य आहे. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओनं प्रत्येक क्रिकेट चाहत्याला आश्चर्याचा धक्का दिला आहे. खरं तर, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की खेळाडूंमधील वाद इतका टोकाला गेला की ते हाणामारीपर्यंत पोहोचले. मैदानाच्या मध्यभागी खेळाडू चक्क एकमेकांना लाथा मारताना आणि मुक्का मारताना दिसले.

थेट सामन्यात लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ MCC वीकडे बॅश XIX लीगचा आहे. ही क्रिकेट लीग UAE (संयुक्त अरब अमिराती) मध्ये खेळवली जाते. या लीगदरम्यान एरोविसा क्रिकेट आणि रबदान क्रिकेट क्लब यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या. खरं तर, सामन्यादरम्यान एरोविसा क्रिकेट संघाच्या गोलंदाजानं रबदान संघाच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर जोरदार जल्लोष केला. गोलंदाजाचं असे सेलिब्रेशन करताना पाहून बॅट्समनचा क्रीजवरच संयम सुटला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही खेळाडू क्रीजवरच एकमेकांना मारताना दिसले. यादरम्यान दोघंही जमिनीवर कोसळले. यानंतर संघातील सहकारी आणि पंचांनी दोन्ही खेळाडूंना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना : क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमध्ये हाणामारी किंवा मारामारीच्या घटना क्वचितच घडतात. पण काही वेळा खेळाडूंचा संयम सुटतो. गेल्या वर्षीही बांगलादेशमध्ये खेळल्या गेलेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सामन्यातील पंचांच्या निर्णयानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. त्यानंतर अंतिम फेरीपूर्वीच लीग रद्द करण्यात आली. त्याचबरोबर भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्येही हाणामारीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

हेही वाचा :

  1. सोन्याचं घड्याळं, दागिने, आयफोन... क्रिकेटमधील अजब-गजब पुरस्कार, 'या' स्पर्धेत तर मिळाली होती अर्धा एकर जमीन - Bizarre Post Match Awards
  2. IND vs BAN Test Day 1: घरच्या मैदानावर 'अण्णा'नं रचला इतिहास... 'अशी' कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू - R Ashwin century

Last Updated : Sep 20, 2024, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.