हैदराबाद Pragyan Ojha Exclusive : भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळालेला वेगवान गोलंदाज हर्षित राणा आगामी श्रीलंका दौऱ्यात पदार्पण करेल, असा विश्वास भारताचा माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझानं व्यक्त केलाय. ओझानं 'ईटीव्ही भारत'सह निवडक माध्यमांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
हर्षित राणाबद्दल काय म्हणाला ओझा : यावेळी बोलतना प्रज्ञान ओझा म्हणाला, "साहजिकच मी म्हणेन की हर्षित राणा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याच्याकडे असलेल्या प्रतिभेचा भारताला फायदा होईल. मला त्याला खेळताना (एकदिवसीय सामन्यांमध्ये) बघायला आवडेल. कारण त्यानं आयपीएलच्या संपूर्ण हंगामात ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्यामुळं मी खूप उत्साहित आहे आणि त्याला खेळायला पाहण्यास उत्सुक आहे. मी त्याला शुभेच्छा देतो." तसंच तुम्ही मला वैयक्तिकरित्या विचाराल तर मला त्याला खेळताना बघायला आवडेल असंही प्रज्ञान ओझा म्हणाला.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी : हर्षित राणा दिल्लीकडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतो. त्यानं 7 सामन्यांमध्ये 28 विकेट घेतल्या आहेत. त्यानं 2024 च्या हंगामात आयपीएल विजेता कोलकाता नाइट रायडर्स (KKR) साठी चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळं वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत तो लवकरच भारतीय संघाकडून खेळू शकतो.
सहयोगी स्टाफची भूमिका महत्त्वाची : क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप वगळता मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सहयोगी स्टाफच्या इतर सदस्यांसाठीही हा पहिलाच दौरा असेल. यावर ओझा म्हणाला, "संघाच्या कामगिरीनुसार सहयोगी स्टाफचं मूल्यमापन केलं जाईल. आम्ही त्यांना सहयोगी स्टाफ म्हणण्यामागं एक कारण आहे. हे लोक नेहमी समर्थन प्रणाली म्हणून काम करतील. मी म्हणेन की संघ ज्या प्रकारे कामगिरी करतो, त्याच प्रकारे सहयोगी स्टाफचं मुल्यमापन केलं जाईल." तसंच जेव्हाही आपण भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्याच्या सहयोगी स्टाफबद्दल बोलतो तेव्हा आपण नेहमी 2024 टी 20 विश्वचषक जिंकण्याबद्दल बोलतो, असंही ते म्हणाले.
(27 जुलै 2024 रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्याचं थेट प्रसारण पाहा चॅनेल सोनी स्पोर्ट्स नेटवर्क हे भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं अधिकृत प्रसारक आहे. ज्यात 3 टी 20 आणि 3 एकदिवसीय सामने होतील.)
हेही वाचा :