नवी दिल्ली Legend Cricketer Retire : आयपीएल गाजवलेल्या दिग्गज खेळाडूनं टी 20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा खेळाडू यानंतर व्यावसायिक स्पर्धा खेळणार नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत, कॅरेबियन प्रीमियर लीग 2024 ही त्याची शेवटची व्यावसायिक स्पर्धा असेल. या हंगामानंतर तो कोणत्याही टी 20 स्पर्धेत दिसणार नसल्याची माहिती दिली.
DWAYNE BRAVO RETIRES FROM CPL.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 31, 2024
- Bravo is playing his last season of the CPL, a legendary player! 👏❤️ pic.twitter.com/chyEgICgOT
शेवटची स्पर्धा : आपल्या निवृत्तीबद्दल बोलत असताना आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळलेला तसंच सध्या सीपीएलमध्ये त्रिनबागो नाइट राइडर्सकडून खेळत असलेल्या ड्वेन ब्राव्होनं सोशल मीडियावर लिहिलं, 'सीपीएल 2024 हा त्याचा शेवटचा हंगाम असेल. त्याला त्याची शेवटची व्यावसायिक स्पर्धा त्याच्या कॅरेबियन चाहत्यांसमोर खेळायची आहे. सीपीएलचा प्रवास त्रिनबागो नाईट रायडर्सपासून सुरु झाला होता आणि आता त्याला या संघासह संपवायचा आहे.'
ब्राव्होनं जिंकल्या 5 ट्रॉफी : ब्राव्हो 2021 मध्ये टी 20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्त झाला. युएईमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर त्यानं आंतरराष्ट्रीय टी 20 ला अलविदा केला होता. 2023 मध्ये त्यानं आयपीएलमधून निवृत्तीही घेतली. आता त्यानं सीपीएलमधील प्रवासही थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे त्यानं चार वर्षांत तीसऱ्यांदा निवृत्ती जाहीर केली. ड्वेन ब्राव्हो हा कॅरेबियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. या लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ब्राव्होनं सीपीएलच्या 103 सामन्यात 128 विकेट घेतल्या आहेत. एवढंच नाही तर त्यानं 5 वेळा सीपीएल ट्रॉफीही जिंकली आहे.
Dwayne Bravo, the highest wicket-taker in CPL history, has announced that this year's tournament will be his last. pic.twitter.com/Nc63EssOJo
— Cricbuzz (@cricbuzz) August 31, 2024
टी 20 मध्ये 600 पेक्षा जास्त विकेट : ड्वेन ब्राव्हो हा टी 20 स्पेशालिस्ट मानला जातो. या फॉरमॅटमध्ये त्यानं जगातील जवळपास प्रत्येक लीगमध्ये भाग घेऊन आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. टी 20 मध्ये 500 विकेट घेणारा तो पहिला खेळाडू आहे. ब्राव्होनं या फॉरमॅटमध्ये 578 सामने खेळले असून त्यानं केवळ गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ब्राव्हो डेथ ओव्हर्समध्ये आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीनं सामने जिंकण्यासाठी प्रसिद्ध आहे. शेवटच्या षटकांमध्ये षटकार मारुन सामना जिंकण्याची क्षमताही त्याच्यात आहे. ब्राव्होनं टी 20 मध्ये आतापर्यंत 630 विकेट घेतल्या आहेत. तसंच फलंदाजीत 6970 धावाही केल्या आहेत.
हेही वाचा :