कार्डिफ England vs Australia 2nd T20I Live Streaming : इंग्लंड क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 सप्टेंबर रोजी झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं यजमान इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला. यानंतर आज या मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल, तर दुसरीकडे या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या निर्धारानं ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरेल.
नवीन खेळाडूंसह इंग्लंडचा संघ मैदानात : इंग्लंडसाठी, श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच टी 20 मालिका सुरु झाली. त्यामुळं यात अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. परिणामी यजमान संघ नवीन खेळाडूंसह टी 20 मालिकेला सुरुवात केली आणि त्यांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी दोन्ही संघ 3 टी 20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. भारतातील अनेक चाहत्यांना हा सामना पाहायची इच्छा आहे, म्हणून हा सामना भारतात कधी, कुठे आणि कशी पाहता येईल ते जाणून द्या.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना कधी होणार?
उभय संघांमधील दुसरा टी 20 सामना 13 सप्टेंबर रोजी होणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होईल.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना कुठं खेळला जाईल?
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी 20 सामना कार्डिफ स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी 20 सामन्याचं भारतात कोणते टीव्ही चॅनेल प्रसारण करतील?
भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्याचं प्रसारण पाहता येणार आहे.
- इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी 20 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीम कशावर?
भारतीय चाहते सोनी लीव्ह ॲप आणि वेबसाइटवर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी 20 सामना ऑनलाइन लाइव्ह पाहू शकतात.
इंग्लंडचा टी 20 संघ : फिल सॉल्ट (कर्णधार/यष्टीरक्षक), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (यष्टीरक्षक), सॅम करन, जोश हल, विल जॅक, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, आदिल राशिद, रीस टोपली, जॉन टर्नर
ऑस्ट्रेलिया टी 20 संघ : मिचेल मार्श (कर्णधार), सेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉयनिस, ॲडम झम्पा
हेही वाचा :