मुंबई Brendon McCullum : बॅझबॉल क्रिकेटचा जनक, न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम आज 43 वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीनं एक वेगळी ओळख निर्माण करणारा मॅक्युलम सध्या इंग्लंड कसोटी आणि वनडे संघाचा प्रशिक्षक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर मॅक्क्युलमनं प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग सुरू केली आणि लवकरच जगातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून त्यांची गणना होऊ लागली.
Happy birthday to Game-changer Brendon McCullum, whose explosive batting and dynamic coaching have kept the cricket world buzzing! 🥳
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 27, 2024
From that sensational knock in the first ever #IPL game in 2008 to smashing RCB’s 1000th six making us the first IPL team to reach that… pic.twitter.com/LE5S00AF5a
कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद शतक, इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात शतक आणि कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकण्याचे विक्रम ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या काही रंजक रेकॉर्ड्सबद्दल सांगणार आहोत.
न्यूझीलंडकडून T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू : ब्रेंडन मॅक्क्युलम हा न्यूझीलंडचा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. T20 क्रिकेटमध्ये मॅक्युलमनं 136.49 च्या स्ट्राइक रेटनं 9,922 धावा केल्या आहेत. मॅक्युलमच्या नावावर या फॉरमॅटमध्ये 7 शतकं आणि 55 अर्धशतकं आहेत. मॅक्युलमच्या नावावर आयपीएलमध्येही दोन शतकं आहेत.
मॅक्युलमचे काही मोठे विक्रम : कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं 107 षटकार मारले आहेत. तसंच सलग 100 हून अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या (101) जगातील पाच क्रिकेटपटूंपैकी मॅक्युलम एक आहे. याशिवाय सलग 122 वनडे सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.
मॅक्क्युलम हा जगातील अशा चार फलंदाजांपैकी एक आहे, ज्यांनी कसोटीत पाचव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना त्रिशतक झळकावलं आहे. यात मायकेल क्लार्क (329*), सर डॉन ब्रॅडमन (304), आणि करुण नायर (303*) असा पराक्रम करणारे इतर फलंदाज आहेत.
6453 Test runs.
— Suyog Warke🇮🇳 (@suyogwarke_) September 27, 2024
- 6083 ODI runs.
- 14676 Int'l runs.
- 19 Int'l Hundreds.
- 158 on IPL Debut.
- Triple Hundred in Tests.
- Fastest Hundred in Tests.
- Fastest 2000 runs in T20I for NZ.
- Wishing a Very happy birthday to One of the Greatest Ever, BRENDON MCCULLUM. ⭐ pic.twitter.com/Hz1JU8kKCd
कसोटीतील सर्वात वेगवान शतक : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर आहे. त्यानं 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 54 चेंडूत ही कामगिरी केली होती.
🧢 432 international appearances
— Sumanth7 (@wankhede__91_) September 27, 2024
🏏 14,676 runs
💯 19 centuries
💯 Fastest Test centurion
💯 First IPL centurion
👑 First player to scored 500, 1000, 1500 & 2000 T20I runs
⭐ A pioneer in T20 cricket
Happy birthday, Brendon McCullum! pic.twitter.com/gNHJQkeusL
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात शतक : तसंच इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावण्याचा विक्रमही मॅक्युलमच्या नावावर आहे. आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मॅक्युलमनं अवघ्या 73 चेंडूत नाबाद 158 धावांची तुफानी खेळी केली होती.
हेही वाचा :