हॅमिल्टन NZ vs ENG 3rd Test : एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनच्या मैदानावर खेळला जात आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कमध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. ज्यात इंग्लंडचा संघ प्रथम गोलंदाजी करत आहे आणि त्यांच्या वतीनं वेगवान गोलंदाज गस ऍटिंकसननं एक मोठा पराक्रम केला. त्यानं आपल्या पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात इतकी चमकदार कामगिरी केली आहे की कसोटी क्रिकेटमध्ये याआधी फक्त एक गोलंदाज करु शकला आहे. ॲटिंकसनने आपला पहिला कसोटी सामना जुलै महिन्यात खेळला होता.
Gus Atkinson has 50 Test match wickets for England! 🏴
— England Cricket (@englandcricket) December 14, 2024
REMINDER: He made his debut in July 🤯 pic.twitter.com/OdjqnxJp7U
पदार्पणाच्या वर्षात कसोटीत 50 बळी घेणारा दुसरा गोलंदाज : कोणत्याही गोलंदाजासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणं आणि नंतर संघातील आपलं स्थान पूर्णपणे पक्के करणं हे अजिबात सोपं काम नाही, परंतु गस ॲटिंकसननं हे साध्य केलं आहे आणि आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. ॲटिंकसननं केवळ त्याच्या पदार्पणाच्या वर्षातच इंग्लंडच्या कसोटी संघातील आपले स्थानच निश्चित केलं नाही, तर त्यानं त्याच्या पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात एक पराक्रम देखील केला जो यापूर्वी केवळ एका गोलंदाजाला करता आला होता.
Matt Potts gets Williamson! 🔥🔥🔥
— England Cricket (@englandcricket) December 14, 2024
Defending late under his eyes, Kane Williamson watches in horror as the ball bounces back, goes underneath his bat and hits middle stump.
A 𝗺𝗮𝘀𝘀𝗶𝘃𝗲 wicket in Hamilton 💪
🇳🇿 1️⃣8️⃣5️⃣-4️⃣ pic.twitter.com/eWIIGOTY6I
एका वर्षात घेतले 50 बळी : एटिंकसनला जुलै 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून त्यानं 11 कसोटी सामने खेळले आहेत आणि 50 हून अधिक बळी त्याच्या नावावर केले आहेत. ॲटिंकसनच्या आधी, कसोटी पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात, फक्त ऑस्ट्रेलियाच्या टेरी अल्डरमन या वेगवान गोलंदाजानं 1981 मध्ये पदार्पण केलं आणि त्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 54 बळी घेतले.
England's day 🥰 pic.twitter.com/fanCLiEpqg
— England Cricket (@englandcricket) December 14, 2024
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज :
- टेरी अल्डरमन (ऑस्ट्रेलिया) - 54 विकेट (वर्ष 1981)
- गस ऍटिंकसन (इंग्लंड) - आतापर्यंत 51 विकेट (वर्ष 2024)*
- कर्टली ॲम्ब्रोस (वेस्ट इंडिज) - 49 विकेट (वर्ष 1988)
- जसप्रीत बुमराह (भारत) - 48 विकेट (वर्ष 2018)
- शोएब बशीर (इंग्लंड) - 47 विकेट (वर्ष 2024)*
https://t.co/4FM0Jgrkhg pic.twitter.com/IP6qKbznpV
— England Cricket (@englandcricket) December 14, 2024
पहिल्या दिवसाचा खेळ कसा : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावून 315 धावा केल्या होत्या. संघाकडून कर्णधार टॉम लॅथमनं सर्वाधिक 63 धावा केल्या. त्यांच्याशिवाय केन विल्यमसननं 44 आणि मिचेल सँटनरनं 50 धावा केल्या आहेत. या खेळाडूंच्या लढाऊ खेळीमुळंच न्यूझीलंड संघाला 300 हून अधिक धावांचा पल्ला गाठता आला.
Day 1 of the third Test between New Zealand and England was a see-saw battle 👊#WTC25 | 📝 #NZvENG: https://t.co/eFDsZcTGwq pic.twitter.com/1xn8oUtH9U
— ICC (@ICC) December 14, 2024
हेही वाचा :