अहमदाबाद 6 Minute Six Hitting Barrage : क्रिकेटमध्ये फलंदाजीत अनेक विक्रम होतात. मात्र गेल्या IPL हंगामात इंग्लंडचा फलंदाज विल जॅकनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुकडून खेळताना केलेला विक्रम नेहमी नेहमी होत नाही. या फलंदाजानं अवघ्या 6 मिनिटांत 10 चेंडूत 50 धावा करत नवा इतिहास रचला होता.
6.41 PM - Will Jacks 50.
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 28, 2024
6.47 PM - Will Jacks 100.
Our 6️⃣ hitting menace took only 6️⃣ minutes. 🙇♂️ pic.twitter.com/UTXl8HWJ05
कोणत्या सामन्यात झाला कारनामा : वास्तविक IPL 2024 मधील 45 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर होता. कारण एकीकडे कोहलीनं चौकार आणि षटकार मारले आणि दुसऱ्या बाजूला विल जॅकनं षटकारांचा पाऊस पाडला होता. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी करत अनेक विक्रम केले होते.
आरसीबीनं मिळवला होता विक्रमी विजय : त्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरातनं 20 षटकांत तीन गडी गमावून 200 धावा केल्या होत्या. त्या IPL मध्ये प्रथम फलंदाजी करताना टायटन्सची ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली होती. मात्र याच्या प्रत्युत्तरात विराट कोहली आणि विल जॅकच्या स्फोटक भागीदारीमुळं आरसीबीनं गुजरातचा नऊ विकेट्सनं दारुण पराभव केला होता. आरसीबीनं IPL च्या इतिहासातील त्यांचं दुसरं सर्वोच्च लक्ष्य गाठलं होतं. विशेष म्हणजे 24 चेंडू शिल्लक असताना संघानं हे यश संपादन केलं होतं.
WILL JACKS COMPLETED HIS HUNDRED WITH A SIX AND WON THE MATCH.
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 28, 2024
- WILL JACK, YOU FREAKING BEAST. pic.twitter.com/anrXC6hU1a
जॅक सर्वात जलद शतक झळकावणारा पाचवा फलंदाज : विल जॅकनं आरसीबीसाठी या सामन्यात स्फोटक कामगिरी केली होता. त्यानं अवघ्या 41 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्याचं IPL कारकिर्दीतील ते पहिलं शतक होतं. यादरम्यान त्यानं 243.90 च्या स्ट्राईक रेटनं पाच चौकार आणि 10 षटकार मारले होते. त्याच्या खेळीमुळं आरसीबीनं 16 षटकांत एक गडी गमावून 206 धावा केल्या आणि सामना नऊ गडी राखून जिंकला. विशेष म्हणजे IPL च्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा जॅक हा पाचवा गोलंदाज ठरला होता. या यादीत अवघ्या 30 चेंडूत शतक झळकावणाऱ्या ख्रिस गेलचं नाव अग्रस्थानी आहे. जॅकनं अवघ्या 10 चेंडूत 50 ते 100 धावांचा टप्पा गाठला होता. यासह त्यानं ख्रिस गेलचा विक्रम मोडला. या अनुभवी खेळाडूनं 50 ते 100 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी केवळ 13 चेंडूंचा सामना केला होता. मात्र या IPL च्या हंगामासाठी जॅकला आरसीबीनं रिटेन केलेलं नाही.
15th over - Will Jacks reaches fifty.
— Kausthub Gudipati (@kaustats) April 29, 2024
16th over - Will Jacks reaches hundred.#GTvsRCB pic.twitter.com/2wZSWc1tma
कोहली आणि जॅक यांच्यातील सर्वात मोठी भागीदारी : 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीनं त्या सामन्यात 40 धावांवर पहिली विकेट गमावली होती. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विल जॅकनं विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 133 धावांची नाबाद भागीदारी केली. गुजरात टायटन्सविरुद्धची ही आयपीएलमधील सर्वात मोठी भागीदारी होती.
हेही वाचा :