नवी दिल्ली Joe Root Record : इंग्लंड क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या या विजयात जो रुटचं महत्त्वाचं योगदान होतं. श्रीलंकेनं आपल्या दुसऱ्या डावात उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी करत सामना रोमांचक बनवला होता. मात्र रुटनं आपल्या 62 धावांच्या अर्धशतकानं इंग्लंडसाठी सामना सोपा केला. या अर्धशतकाबरोबरच त्यानं काही मोठे पराक्रमही केले. कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकं झळकावण्याच्या बाबतीत रुटनं भारताचा 'द वॉल' राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला मागं टाकलं. त्याचवेळी तो सचिनच्या विक्रमाच्या जवळ आला आहे. या खेळीमुळं तो महान फलंदाजांच्या यादीत आला आहे.
Most fifties in Test cricket:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 24, 2024
Sachin Tendulkar - 68.
Shivnarine Chanderpaul - 66.
Joe Root - 64*.
- Joe Root, the greatest English batter! pic.twitter.com/sPELjRktWj
रुट टॉप-3 मध्ये समाविष्ट : जो रुटनं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या डावात कारकिर्दीतील 64 वं अर्धशतक झळकावलं. यासह, तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानं राहुल द्रविड आणि ॲलन बॉर्डरला मागं टाकलं आहे. या दोन्ही फलंदाजांनी कसोटीत 63-63 अर्धशतकं केली होती. आता रुटच्या पुढे फक्त वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल आणि भारताचा सचिन तेंडुलकर उरला आहे. दोन अर्धशतकांनंतर तो चंद्रपॉलच्या बरोबरीचा असेल. तर आणखी 4 अर्धशतकं ठोकून तो सचिनची बरोबरी करु शकेल. अर्थात, क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिनचा हा विक्रम लवकरच जो रुट मोडण्याची शक्यता आहे.
सचिनचा आणखी विक्रम धोक्यात : श्रीलंकेनं सामन्याच्या तिसऱ्या डावात शानदार खेळी करत साहेबांना 205 धावांचं लक्ष्य दिलं. चौथ्या डावात फलंदाजी करताना रुटनं 62 धावा केल्या होत्या. यासह त्यानं आणखी एक मोठा पराक्रम केला. आता कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. त्यामुळं सचिनचा हा विक्रम धोक्यात आला आहे. चौथ्या डावात फलंदाजी करताना त्यानं 1622 धावा केल्या होत्या, तर रुटनं 1589 धावा केल्या होत्या. तर रुट 34 धावा करताच हा विक्रम मोडेल. 23 धावा केल्यावर तो ॲलिस्टर कुक आणि ग्रॅमी स्मिथला मागे टाकेल.
एवढंच नाही तर 33 वर्षीय जो रुट हळूहळू सचिनच्या आणखी एका विक्रमाच्या जवळ येत आहे. रुटनं 143 कसोटी सामन्यांच्या 261 डावांमध्ये 50.11 च्या सरासरीनं 12 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात 32 शतकांचाही समावेश आहे. आता तो सचिनच्या विक्रमापासून 4 हजार धावा दूर आहे. रुट टेस्टमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा सचिनचा विक्रमही आपण मोडू शकतो.
हेही वाचा :