नॉटिंगहॅम Joe Root Record : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात जो रुटनं 178 चेंडूत 122 धावा करुन तो बाद झाला. कॅरेबियन संघाविरुद्ध शतक झळकावून इंग्लिश फलंदाज जो रुटनं वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलला मागे टाकत मोठी कामगिरी केली आहे.
💯💯💯💯💯💯💯💯
— England Cricket (@englandcricket) July 21, 2024
💯💯💯💯💯💯💯💯
💯💯💯💯💯💯💯💯
💯💯💯💯💯💯💯💯
JOE ROOT HAS TEST CENTURY NUMBER THIRTY TWO! 🤯 pic.twitter.com/ArTXMMbaO2
सर्वाधिक धावा करणारा आठवा फलंदाज : या शतकी खेळीसह जो रुट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील आठवा फलंदाज बनला आहे. वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलला त्यानं मागं टाकलंय. जो रुटनं कसोटी क्रिकेटमध्ये 11940 धावा केल्या आहेत. चंदरपॉलच्या नावावर कसोटीत 11867 धावा होत्या. रुटनं 260 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. रुट आता वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या 11953 धावांच्या विक्रमापासून फक्त 13 धावा दूर आहे. इतक्या धावा केल्यानंतर तो सर्वाधिक धावा करणारा सातवा फलंदाज ठरेल.
कसोटीत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
- सचिन तेंडुलकर (भारत) - 15921
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 13378
- जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 13289
- राहुल द्रविड (भारत) - 13288
- ॲलिस्टर कुक (इंग्लंड) - 12472
- कुमार संगकारा (श्रीलंका) - 12400
- ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) - 11953
- जो रुट (इंग्लंड) - 11869
सचिनचा विक्रम धोक्यात : या विक्रमासह जो रुट कसोटीत सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 62 अर्धशतकं आहेत आणि सध्या खेळणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याच्यापेक्षा जास्त अर्धशतकं झळकावणाऱ्या सर्व फलंदाजांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत 7 अर्धशतकं झळकावल्यानंतर रुट सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडेल.
कसोटीत सर्वाधिक अर्धशतकं झळकवणारे फलंदाज :
- 68 - सचिन तेंडुलकर (भारत)
- 66 - शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज)
- 63 - राहुल द्रविड (भारत)
- 63 - ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
- 62* - जो रुट (इंग्लंड)
हेही वाचा :