लंडन ENG vs SL 2nd Test Live Streaming : इंग्लंड क्रिकेट संघ आणि श्रीलंका यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना मँचेस्टर इथं खेळला गेला. यात यजमान इंग्लिश संघानं 5 विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघानंही चुरशीची लढत दिली, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. आता दुसरा कसोटी सामना आज 29 ऑगस्टपासून लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की क्रिकेट चाहते भारतात कधी आणि विनामूल्य सामन्याचा कसा आनंद घेऊ शकतात? (ENG vs SL 2nd Test Live)
All eyes on series victory 👊
— England Cricket (@englandcricket) August 28, 2024
📍 Lord's Cricket Ground pic.twitter.com/cF7NRUQqdZ
- इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना कधी खेळवला जाईल?
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना आज गुरुवार, 29 ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे.
- इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कुठं खेळला जाईल?
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवली जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होईल.
- भारतातील इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना कसा पाहायचा?
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसंच सोनी लाइव्ह ॲपवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
- श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
बेन डकेट, डॅन लॉरेन्स, ऑली पोप (कर्णधार), जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, ऑली स्टोन, शोएब बशीर.
- श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : निशान मदुष्का/पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, मिलन रथनायके, विश्वा फर्नांडो, आसिथा फर्नांडो
हेही वाचा :
- राष्ट्रीय क्रीडा दिन 2024 : काय आहे इतिहास, का साजरा केला जातो हा दिवस? - National Sports Day 2024
- सामना सुरु असतानाच 27 वर्षीय खेळाडूला हृदयविकाराचा झटका; उपचारादरम्यान मृत्यू - Player Passes Away
- काय सांगता...! पाकिस्तान क्रिकेटमध्ये AI च्या माध्यमातून खेळाडूंची निवड? पीसीबी अध्यक्षांचं अजब वक्तव्य - Artificial intelligence in Cricket