लंडन Dawid Malan : इंग्लंड क्रिकेट संघाचा स्फोटक आणि टी 20 आंरराष्ट्रीयमधील नंबर-1 फलंदाज डेव्हिड मलान यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यानं वयाच्या 37 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हा डावखुरा फलंदाज इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. मलान अखेरचा नोव्हेंबर 2023 मध्ये इंग्लंडकडून खेळताना दिसला होता. अलीकडेच तो इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या 'द हंड्रेड' स्पर्धेचाही भाग होता. तो या स्पर्धेत ओवल इन्विंसिबल संघाचा एक भाग होता, जो विजेता ठरला.
🚨 FORMER NO.1 RANKED T20I BATTER - DAWID MALAN RETIRES FROM INTERNATIONAL CRICKET. 🚨 pic.twitter.com/gvvb6xvh3g
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 28, 2024
डेव्हिड मलानचा विश्वविक्रम : डेव्हिड मलान हा एकदिवसीय आणि टी 20 फॉरमॅटमधील एक विशेष फलंदाज होता. विशेषत: टी-20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी अप्रतिम होती. मलाननं 62 टी 20 सामन्यांमध्ये 36.38 च्या सरासरीनं 1892 धावा केल्या आणि या खेळाडूनं दीर्घकाळ आयसीसी टी 20 क्रमवारीत अव्वल स्थान राखलं. टी 20 क्रमवारीत 900 पेक्षा जास्त रेटिंग पॉइंट्स मिळविणारा मालन हा जगातील एकमेव फलंदाज होता. विराट कोहलीनंही टी 20 क्रमवारीत दीर्घकाळ अव्वल स्थान राखलं होतं पण त्याचं सर्वोच्च रेटिंग 897 होते.
डेव्हिड मलानची कारकिर्द : डेव्हिड मलानबद्दल सांगायचं तर हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेत लहानाचा मोठा झाला. त्यानं दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटची सुरुवात केली. पण त्यानंतर तो 2006 मध्ये इंग्लंडला गेला आणि त्यानंतर तो बराच काळ मिडलसेक्सकडून खेळला. मलानच्या कारकिर्दीची रंजक गोष्ट म्हणजे 2017 मध्ये त्यानं आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना त्याच्याच देश दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. मलाननं पहिल्या टी 20 सामन्यात 78 धावा केल्या आणि तो सामनावीर देखील ठरला. 2020 सालापर्यंत हा डावखुरा फलंदाज टी 20 चा नंबर 1 फलंदाज देखील बनला. मलाननं टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त 24 डावात 1000 धावा केल्या, जो एक विश्वविक्रम आहे 2022 मध्ये, इंग्लंडने टी 20 विश्वचषक जिंकला आणि मालन त्या संघाचा एक भाग होता.
हेही वाचा :