मुंबई TaTa Mumbai Marathon २०२४ : आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित अशी टाटा मुंबई मॅरेथॉन रविवारी २१ जानेवारीला होत आहे. या मॅरेथॉनसाठी संपूर्ण मुंबई नगरी सज्ज झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटू सुद्धा सज्ज झाले आहेत. मॅरेथॉनचे आयोजक प्रोकॅम यांनी सुद्धा या मॅरेथॉनसाठी पूर्ण तयारी केली आहे. तर अंतिम क्षणापर्यंत ही धाकधूक वाढली जाणार आहे. मुंबई मॅरेथॉनचं नाव हे भारताच्याच नाही तर जगातील मॅरेथॉनच्या नकाशावर पोहचलं आहे. उत्तम आरोग्य याचबरोबर पर्यावरण समतोल राहण्यासाठी प्लास्टिक मुक्ती, झाडे वाचवा, पाण्याची बचत असे विविध सामाजिक जनजागृती संदेश मॅरेथॉनच्या माध्यमातून नागरिक देणार आहेत.
केटी मून मॅरेथॉनची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर : ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्ट पटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन सारख्या सहनशक्तीच्या अशा शर्यतीमुळंच मानसिक आरोग्य सुधारते आणि खेळाडूंना योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होते. तसंच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा भारताची शान असल्याचंही केटी यांनी सांगितलंय.
रेकॉर्ड ब्रेक धावपटूंचा समावेश : या मॅरेथॉनमध्ये एकूण ५९,५१५ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. मुख्य मॅरेथॉनमध्ये ९७२४ पुरुष तर ९८७ महिलांचा समावेश आहे. अर्ध मॅरेथॉनमध्ये १२३२२ पुरुष तर २८९६ महिलांचा समावेश आहे. १० किलोमीटरच्या स्पर्धेत ४१४० पुरुष तर २९९० महिलांचा समावेश आहे. ड्रीम रन या स्पर्धेसाठी १२३९० पुरुष तर ८२०० महिलांनी सहभाग घेतला आहे. सीनियर सिटीजनमध्ये १०१० पुरुष तर ७२२ महिलांनी सहभाग घेतला असून विकलांग दौडमध्ये ७७९ पुरुष आणि ३३५ महिलांनी सहभाग घेतलाय.
रेल्वेकडून पाच विशेष लोकल गाड्या : रविवारी होणाऱ्या मॅरेथॉनसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेनं तीन अतिरिक्त विशेष स्लो लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना या विशेष ट्रेनचा उपयोग होणार आहे. पहिली विशेष ट्रेन पहाटे २:१५ मिनिटांनी विरार येथून सुटून ती चर्चगेटपर्यंत जाईल. दुसरी ट्रेन ही पहाटे ३ वाजता वांद्राच्या दिशेने सुटेल तिसरी विशेष ट्रेन ही बोरवलीवरून पहाटे ३:०५ मिनिटांनी चर्चगेटसाठी सुटणार आहे. मध्य रेल्वेवर सुद्धा कल्याणहून पहाटे ३ वाजता विशेष ट्रेन सोडली जाणार आहे. ती ४:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. हार्बर मार्गावर पनवेलवरून विशेष ट्रेन पहाटे ३:१० मिनिटांनी सोडली जाणार आहे. ती ४:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या सर्व ट्रेन प्रत्येक स्थानकांवर थांबणार असून मॅरेथॉनमध्ये सामील झालेल्या धावपटूंना नियोजित वेळेवर पोहोचण्यासाठी याची फार मोठी मदत होणार आहे.
या वेळेवर सुरू होणार स्पर्धा : ४२.१९५ किलो मीटरची मुख्य मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होणार आहे. तर २१.०९७ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता माहीम रेतीबंदर, माहीम कॉजवे इथून सुरू होणार आहे. १० किलो मीटरची मॅरेथॉन सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू होईल. त्यानंतर मुख्य एलिट हौशी मॅरेथॉन सकाळी ७:२० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होईल. त्याचबरोबर ७:२२ मिनिटांनी चॅम्पियनशिप विथ डिसॅबिलिटी (विकलांग) ही १:०३ किलोमीटरची मॅरेथॉन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होईल. सीनियर सिटीजन रन ही ४:०२ किलोमीटरची दौड सकाळी ७:३५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरु होणार असून, ८ वाजता ड्रीम रन ही ५:०९ किलोमीटरची दौड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होणार आहे.
मॅरेथॉन मार्गावर पूर्ण तयारी : या मॅरेथॉनसाठी एकंदरीत २ लाख ५ हजार लिटर बिसलरी पाणी उपलब्ध करण्यात आलं आहे. त्याचबरोबर ५८ हजार लिटर फास्ट अँड ड्रिंक ठेवण्यात आली आहे. याकरता २६ वॉटर स्टेशन बनवण्यात आली असून यातील ३ वॉटर स्टेशन हे मॅरेथॉन संपण्याच्या जागी असणार आहेत. १० ऑरेंज आणि सॉल्ट स्टेशन ६ कॅडबरी फ्युज स्टेशन, त्याचबरोबर ४ आईस स्टेशन ठेवण्यात आले आहेत. तसंच १० मेडिकल स्टेशन ऑन कोर्स, ३ बेस कॅम्प, १३ ॲम्बुलन्स तसंच १३ बाईक मेडिकल उपलब्ध असणार आहेत.
या कलाकारांचा सहभाग : अभिनेत्री निकिता दत्त, तारा शर्मा, सागरीका घोष, अभिनेता मॉडल मिलिंद सोमन, राहुल बोस यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. त्याचबरोबर उद्योगपती अनिल अंबानी, चंद्रशेखरन नटराजन, विनिता सिंग यांचाही सहभाग असणार आहे.
हेही वाचा -