ETV Bharat / sports

भारतीय संघासह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय सुरक्षा पाकिस्तानला जाणार? काय सांगतात नियम - ICC Champion Trophy - ICC CHAMPION TROPHY

Champion Trophy Security : चॅम्पियन ट्रॉफी 2025 बाबत पाकिस्तानमध्ये मोठी चर्चा आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं की, भारत सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर क्रिकेट संघ पाकिस्तानचा दौरा करु शकतो. अशा स्थितीत भारतीय सुरक्षा पाकिस्तानात जाणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

Champion Trophy
चॅम्पियन्स ट्रॉफी (ANI Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 1, 2024, 12:44 PM IST

नवी दिल्ली ICC Champion Trophy Security : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जसजशी जवळ येत आहे, तसतसं चाहत्यांमध्ये उत्साह वाढत आहे. या स्पर्धेला अजून 6 महिने बाकी असले तरी यजमान पाकिस्तानची तयारी जोरात सुरु आहे. यासोबतच पाकिस्तानमधूनही भारतीय संघाबाबत अनेक प्रतिक्रिया येत आहे. भारताचा पाकिस्तान दौरा अजून निश्चित झालेला नाही. पण, भारतीय क्रिकेट संघ नक्कीच पाकिस्तान दौरा करेल अशी पाकिस्तानला आशा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करायचे आहेत. मात्र, भारत सरकारची इच्छा असल्यास भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करु शकतो. अशा स्थितीत भारतीय संघासह पाकिस्तानला सुरक्षा पाठवता येईल का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

भारतीय संघासोबत सुरक्षा दल जाणार : सामान्यत: कोणत्याही कार्यक्रमात किंवा स्पर्धेत दौऱ्यापूर्वी कोणत्याही देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला की, सुरक्षा पथक भेट देत असते. या संघांना क्रिकेट मैदान आणि इतर सुविधांच्या सुरक्षेचे मुल्यांकन करण्यासाठी पाठवलं जातं. परंतु, मुख्य सुरक्षा यजमान देशाकडून दौऱ्यावर आलेल्या खेळाडूंना पुरवली जाते. सुरक्षा व्यवस्थापक क्रिकेट संघासोबत प्रवास करतात. वास्तविक, कोणत्याही देशाला आपल्या क्रिकेट संघासोबत सैन्य किंवा कोणतीही सशस्त्र सुरक्षा घेण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत, भारतीय संघ दौऱ्यापूर्वी आपल्या एजन्सींना तपासणीसाठी पाठवू शकतो. परंतु, त्यात फक्त सुरक्षा अधिकारी परवानगी घेऊ शकतात. कोणत्याही सशस्त्र दलाला जाऊ दिलं जाणार नाही.

आतापर्यंत कोणत्या देशांनी दौऱ्यांपूर्वी सुरक्षा पथकं पाठवली आहेत

  • न्यूझीलंड पाकिस्तान दौरा 2024 : एप्रिलमध्ये टी 20 मालिकेपूर्वी किवी संघाच्या दौऱ्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेटचे सुरक्षा शिष्टमंडळ पाकिस्तानला पोहोचलं होतं. ज्यामध्ये न्यूझीलंड क्रिकेटचे 2 सदस्य आणि एका स्वतंत्र सुरक्षा तज्ञाचा समावेश होता. त्यांनी लाहोर, रावळपिंडी आणि इस्लामाबादला भेट देत आढावा घेतला होता.
  • 2008 मध्ये इंग्लंडचा भारत दौरा : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे सुरक्षा तज्ञ रेग डिकासन हे स्टेडियम आणि हॉटेलची पाहणी करण्यासाठी आणि इंग्लंडच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी भारतात आले होते.
  • 2005 मध्ये इंग्लंडचा पाकिस्तान दौरा : इंग्लंड दौऱ्याच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) चे दोन सुरक्षा तज्ज्ञ पाकिस्तानच्या कराची शहरात आले होते.
  • 2001 मध्ये इंग्लंडचा भारत दौरा : 2001 मालिकेतील भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान BCCI नं सुरुवातीला सांगितलं होतं की भारत दौऱ्यावर येणाऱ्या संघाला कोणतीही विशेष सुरक्षा पुरवणार नाही आणि इंग्लंडला भारतात असताना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेवर अवलंबून राहावं लागेल. इंग्लंडनं संघाच्या सुरक्षेसाठी मॅथ्यू किलब्राइड आणि डग्लस डिक या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना क्रिकेट पथकासोबत आणलं होतं. परंतु, त्यांना भारत सरकारनं इंग्लंड संघाभोवती सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या विशिष्ट सूचना दिल्या होत्या.

हेही वाचा :

  1. 6,6,6,6,6,6... एका षटकात मारले सहा षटकार; भारताला मिळाला दुसरा 'युवराज सिंग', पाहा व्हिडिओ - Delhi Premier League 2024
  2. हा कसला आंतरराष्ट्रीय सामना... फक्त 10 चेंडू अन् खेळ खल्लास; हे कसं झालं भावा? - T20 Cricket

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.