शारजाह BANW vs WIW Live Streaming : ICC महिला T20 विश्वचषकाचा तेरावा सामना आज 10 ऑक्टोबर रोजी बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात होणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.
Bangladesh and West Indies press their #T20WorldCup claims in Sharjah 👊
— ICC (@ICC) October 10, 2024
Day 8 preview 👉 https://t.co/FGsAPhkyN4#WhateverItTakes pic.twitter.com/vrjnLqKgVQ
दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना : T20 विश्वचषकात बांगलादेश महिला संघानं विजयानं आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पण दुसऱ्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत बांगलादेश संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध स्पर्धेत दुसरा विजय नोंदवू इच्छितो. दुसरीकडे, वेस्ट इंडिजला त्यांच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडचा 2 गडी राखून पराभव झाला. अशा स्थितीत बांगलादेशचा पराभव करुन स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविण्याकडे वेस्ट इंडिजचं लक्ष असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
It's almost time to rally!🙌🏾
— Windies Cricket (@windiescricket) October 9, 2024
The #MaroonWarriors are on the hunt for back to back wins!💪🏾#WIBelieve | #T20WorldCup pic.twitter.com/umR7egRXaZ
हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : बांगलादेश महिला आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांनी T20 मध्ये 3 वेळा खेळल्या आहेत. ज्यात वेस्ट इंडिजचा वरचष्मा दिसत आहे. वेस्ट इंडिजनं तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला एकही विजय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत आज बांगलादेशचा संघ T20 मध्ये पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध उतरणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना गुरुवार, 10 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 07:30 वाजता सुरु होईल.
ICC Women's T20 World Cup 2024
— Bangladesh Cricket (@BCBtigers) October 9, 2024
Bangladesh 🆚 West Indies | 10 October, 2024
Venue: Sharjah | Time: 08:00 PM (BST)
Photo Credit: ICC/Getty#BCB #Cricket #BANWvWIW #T20WorldCup pic.twitter.com/qNCT5Z5zlg
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा बांगलादेश महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
वेस्ट इंडिज महिला संघ : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, स्टॅफनी टेलर, शॅमीन कॅम्पबेल (यष्टिरक्षक), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, आलिया ॲलेने, चाडियन नेशन, एफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसर, करिश्मा रामहरक.
बांग्लादेश महिला संघ : शठी रानी, दिलारा अक्टर, शोभना मोस्टोरी, निगार सुलताना (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ताज नेहर, शूर्णा अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर, मारुफा अक्टर.
हेही वाचा :