ॲडलेड AUS vs PAK 2nd ODI Live Streaming : ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा वनडे सामना 8 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना ॲडलेडच्या ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला वनडे सामना यजमान जिंकत ऑस्ट्रेलियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी आहे. पाकिस्तान संघानं ऑस्ट्रेलियात शेवटचा वनडे सामना 15 जानेवारी 2017 रोजी जिंकला होता. मेलबर्न इथं झालेल्या त्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. मात्र त्यानंतर आता जवळपास साडेसात वर्षांत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियात वनडे सामना जिंकता आलेला नाही.
Fielding session vibes ✨
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 6, 2024
Pakistan train for the second #AUSvPAK ODI 🏏 pic.twitter.com/rgrwjo7Fnt
पहिल्या वनडेत काय झालं : मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 2 गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 46.4 षटकांत 203 धावांवरच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियानं 33.3 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठलं. यासह यजमान संघानं तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत दुसऱ्या वनडेत पाकिस्तानला पराभूत करुन मालिका काबीज करण्यावर ऑस्ट्रेलियाचं लक्ष असेल. दुसरीकडं, दुसरा वनडे सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचं पाकिस्तानचा प्रयत्न असेल. करो किंवा मरो अशा या सामन्यात पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल. परिणामी दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
" really enjoyed it and the players readily gave their feedback" 🤝
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 6, 2024
net bowlers in adelaide talk about the experience of bowling to the pakistan batters 🔊#AUSvPAK pic.twitter.com/HZvVqkHmHM
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे संघ आतापर्यंत 109 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं 109 पैकी 71 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्ताननं केवळ 34 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना बरोबरीत तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलिया पाकिस्तानपेक्षा बलाढ्य आहे हे स्पष्ट झालं आहे. याआधी दोन्ही संघांनी शेवटची वनडे मालिका 2022 मध्ये खेळली होती.
The pacers give it their all in a hard-fought contest at the MCG!
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 4, 2024
Australia win the first ODI by two wickets 🏏#AUSvPAK pic.twitter.com/33tlPGH7Ap
ॲडलेड मैदानाची खेळपट्टी कशी असेल : ॲडलेड ओव्हलची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील संतुलनासाठी ओळखली जाते. वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला चांगली उसळी आणि वेग मिळतो, जे सुरुवातीला फलंदाजांना आव्हान देऊ शकतात. जसा सामना पुढं सरकतो. खेळपट्टी खराब होऊ शकते, ज्यामुळं फिरकीपटूंना अधिक वळण आणि उसळी मिळू शकते. याशिवाय, ही खेळपट्टी फलंदाजांसाठी देखील चांगली मानली जाते, विशेषत: या मैदानाच्या सीमा खूपच लहान आहे. तथापि, उन्हाच्या दिवसात खेळपट्टी कोरडी होते, ज्यामुळं फिरकी गोलंदाजांना मदत होते, तर ढगाळ आकाश वेगवान गोलंदाजांना मदत करते. दिवस/रात्रीच्या सामन्यांमध्ये, चेंडू प्रकाशात अधिक स्विंग होतो.
ॲडलेड ओव्हल स्टेडियमवरील एकदिवसीय सामन्यांची आकडेवारी :
प्राप्त रिपोर्ट्सनुसार, ॲडलेड ओव्हल स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 93 वनडे सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 49 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 42 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय या मैदानावर आतापर्यंत दोन वेळा वनडे सामने टाय झाले किंवा निकाल लागलेला नाही.
- ॲडलेड ओव्हल स्टेडियमवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या : 226
- ॲडलेड ओव्हल स्टेडियमवरील दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या : 198
A quality start to the ODI series!
— cricket.com.au (@cricketcomau) November 4, 2024
The Aussies take the win in a close one in Melbourne #AUSvPAK pic.twitter.com/CjLMFW9DXS
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुसरा वनडे सामना कधी होणार?
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी ॲडलेड ओव्हल, ॲडलेड इथं भारतीय वेळेनुसार सकाळी 9:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धातास आधी म्हणजे सकाळी 08:30 वाजता होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान दुसरा वनडे सामना कधी, कुठं आणि कसा पाहायचा?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, तुम्ही डिस्नी+ हॉटस्टार ॲपवर सामन्याच्या लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
ऑस्ट्रेलिया संघ : मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मार्नस लॅबुशॅग्ने, ॲरॉन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, शॉन ॲबॉट, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, मार्कस स्टॉइनिस, कूपर कॉनोली, जोश हेझलवुड
पाकिस्तान संघ : अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक/कर्णधार), कामरान गुलाम, आगा सलमान, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, फैसल अक्रम, हसिबुल्ला खान, आमेर जमाल, अराफत मिन्हास
हेही वाचा :