ब्रिस्बेन AUS vs PAK 1st T20I Live Streaming : ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना ब्रिस्बेन येथील द गाबा इथं खेळवला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. आता सर्वांच्या नजरा T20 मालिकेकडे लागल्या आहेत. यजमान संघाचा T20 मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे, पाकिस्तान संघही T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न करेल. T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाची कमान जोश इंग्लिशच्या खांद्यावर आहे. तर पाकिस्तानचं नेतृत्व मोहम्मद रिझवानकडे असेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.
Practice session in Brisbane: Pakistan take on Australia in the first T20I tomorrow 🏏#AUSvPAK pic.twitter.com/3PnkdGRW4J
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 13, 2024
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे संघ आतापर्यंत एकूण 25 वेळा आंतरराष्ट्रीय T20 सामने खेळले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं 25 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्ताननं 11 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित राहिला. 2022 मध्ये दोन्ही संघ शेवटच्या T20 मध्ये आमनेसामने आले होते. तेव्हा ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 3 गडी राखून पराभव केला.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरनं पाकिस्तानविरुद्धच्या 16 सामन्यांच्या 16 डावांमध्ये 30.53 च्या सरासरीनं 397 धावा केल्या आहेत. यात डेव्हिड वॉर्नरनं 2 अर्धशतकं झळकावली असून 59 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
Onwards to Brisbane for the first of the three #AUSvPAK T20Is 🧳 pic.twitter.com/DiiTaRdyde
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 11, 2024
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज :
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील T20 सामन्यात पाकिस्तानच्या सईद अजमलनं सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. सईद अजमलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 11 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 14.26 च्या सरासरीनं आणि 6.40 च्या इकॉनॉमीनं 19 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय पाकिस्तानचा मोहम्मद आमिर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद आमिरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 10 सामन्यांच्या 10 डावांमध्ये 16.17 च्या सरासरीनं आणि 7.71 च्या इकॉनॉमीनं 17 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 15 विकेटसह चौथ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात पहिला T20 सामना कधी होणार?
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला T20 सामना आज गुरुवारी, 14 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनमधील द गाबा इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धा तास आधी होईल.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात पहिला T20 सामना कधी, कुठं आणि कसा पाहायचा?
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला T20 सामना भारतात स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, तुम्ही डिस्नी+हॉटस्टार ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
पाकिस्तान : अराफत मिन्हास, बाबर आझम, ओमेर युसूफ, इरफान खान, आगा सलमान, जहांदद खान, हसिबुल्ला खान, मोहम्मद रिझवान (कर्णधार), साहिबजादा फरहान, उस्मान खान, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम.
ऑस्ट्रेलिया : टिम डेव्हिड, जेक फ्रेझर-मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट, कूपर कोनोली, ॲरॉन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस (कर्णधार), झेवियर बार्टलेट, स्पेन्सर जॉन्सन, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा.
हेही वाचा :