शारजाह AFG vs BAN 1st ODI Live Streaming : अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आज 6 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. तिन्ही वनडे सामने शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने एकदिवसीय मालिका पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान संघ पुन्हा मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानला पराभूत करणं हे बांगलादेशसाठी मोठं आव्हान असेल. दुसरीकडे मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 अशी कसोटी मालिका गमावल्यानंतर बांगलादेश संघ या मालिकेत प्रवेश करेल. या वनडे मालिकेसाठी बांगलादेशनं आपल्या संघात नवीन वेगवान गोलंदाज नाहिद राणा आणि यष्टीरक्षक जॅकर अली यांचा समावेश केला आहे. झाकीर हसन आणि नसुम अहमद यांचंही एका वर्षानंतर संघात पुनरागमन झालं आहे.
🎬 Behind the Scenes of the Headshots Session: Non-stop laughs with the #𝗔𝗳𝗴𝗵𝗮𝗻𝗔𝘁𝗮𝗹𝗮𝗻 📸😂 #𝗔𝗙𝗚𝘃𝗕𝗔𝗡 | #𝗚𝗹𝗼𝗿𝗶𝗼𝘂𝘀𝗡𝗮𝘁𝗶𝗼𝗻𝗩𝗶𝗰𝘁𝗼𝗿𝗶𝗼𝘂𝘀𝗧𝗲𝗮𝗺 pic.twitter.com/oXcEzZ3XYD
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 5, 2024
दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मालिका : ही वनडे मालिका अफगाणिस्तान आणि बांगलादेशसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. कारण ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे ती आता फार दूर नाही. गेल्या वर्षी वनडे विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Intensity 🆙!
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 5, 2024
📸📸: #AfghanAtalan continue to work hard as they gear up for their exciting three-match ODI series against Bangladesh, starting tomorrow in Sharjah. 👏#AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/X8suI8S94s
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आतापर्यंत 16 वेळा वनडे सामन्यांमध्ये आमनेसाममने आले आहेत. ज्यात बांगलादेशचा वरचष्मा दिसत आहे. बांगलादेशनं 16 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्ताननंही 6 सामने जिंकले आहेत. यावरुन हे स्पष्ट होतं की जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांशी भिडतात तेव्हा चुरशीची स्पर्धा होते. मात्र, बांगलादेशचा रेकॉर्ड चांगला असल्यानं ते अधिक मजबूत दिसत आहेत.
खेळपट्टी कशी असेल : शारजाहच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना खूप मदत मिळते. या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना संथ वळणं घेणाऱ्या गोलंदाजांचा वरचष्मा असतो. मात्र सीमारेषा लहान असल्यानं त्याचा फायदा फलंदाजही घेऊ शकतो. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.
📸📸: Afghanistan FutureStars are underway with their preparations ahead of their Tri-Nation Series and the ACC Men's U19 Asia Cup 2024 in UAE. 🤩#FutureStars pic.twitter.com/8kFQazkod2
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 3, 2024
मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला वनडे सामना : 06 नोव्हेंबर
- दुसरा वनडे सामना : 09 नोव्हेंबर
- तिसरा वनडे सामना : 11 नोव्हेंबर
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सामन्यांमध्ये बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमनं सर्वाधिक धावा केल्या आहेत. मुशफिकर रहीमनं अफगाणिस्तानविरुद्ध 15 सामन्यांच्या 14 डावांमध्ये 35.30 च्या सरासरीनं 459 धावा केल्या आहेत. या कालावधीत मुशफिकुर रहीमनं 4 अर्धशतकं झळकावली असून 86 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
𝐓𝐈𝐂𝐊𝐄𝐓𝐒 𝐀𝐑𝐄 𝐍𝐎𝐖 𝐀𝐕𝐀𝐈𝐋𝐀𝐁𝐋𝐄!!! 🎟️
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 3, 2024
Don’t miss out on the excitement of this epic showdown! Head over to https://t.co/UcUCiegmgS or scan the QR code to secure your seats for the high-intensity action between Afghanistan and Bangladesh. 🤜🤛#AfghanAtalan pic.twitter.com/Cq8HOGqPzl
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज :
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सामन्यात बांगलादेशच्या शाकिब अल हसननं सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. शकिब अल हसननं अफगाणिस्तानविरुद्धच्या 15 सामन्यांत 18.56 च्या सरासरीनं आणि 4.16 च्या इकॉनॉमीनं 30 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय बांगलादेशचा तस्किन अहमद या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तस्किन अहमदनं अफगाणिस्तानविरुद्धच्या 11 सामन्यांत 19.50 च्या सरासरीनं आणि 4.80 च्या इकॉनॉमीनं 20 बळी घेतले आहेत. तर अफगाणिस्तानचा राशिद खान 19 विकेट्ससह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
Training moments as the Bangladesh team prepares to take on Afghanistan in the upcoming series! | Sharjah Cricket Stadium | #BANvAFG pic.twitter.com/DbLFQZdXuD
— Bangladesh Cricket (@BCBtigers) November 4, 2024
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
बांगलादेश संघ विरुद्ध अफगाणिस्तान संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 6 नोव्हेंबर (बुधवार) रोजी शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 03:00 वाजता होईल.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश वनडे सामन्याचं थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं आणि कसं पहावं?
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश वनडे सामना प्रसारित करण्याचे अधिकार भारतात फॅनकोडला आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश वनडे मालिका टीव्हीवर प्रसारित करण्यासाठी उपलब्ध नाही.
Moments from the Bangladesh team's preparations for the series against Afghanistan | Sharjah Cricket Stadium | #BANvAFG pic.twitter.com/vPzjBH3g1L
— Bangladesh Cricket (@BCBtigers) November 4, 2024
सामन्यासाठी दोन्ही संघ :
बांगलादेशचा संघ : सौम्या सरकार, तनजीद हसन, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, तौहीद हृदोय, जॅक अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, नसुम अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा.
अफगाणिस्तानचा संघ : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), फरीद अहमद, इक्रम अलीखिल (यष्टिरक्षक), नूर अहमद, सेदीकुल्ला अटल, फजलहक फारुकी, अल्लाह मोहम्मद गझनफर, रहमानउल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), रियाझ हसन, रशीद खान, नांगियालाई खरोती, अब्दुल मलिक, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, अजमतुल्ला उमरझाई, दरविश रसौली, बिलाल सामी, नवीन झदरन.
हेही वाचा :