AFG vs SA T20 World Cup : दक्षिण आफ्रिका टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. उपांत्य फेरीत आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 9 विकेट राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ केवळ 56 धावांवरच आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेसाठी रीझा हेंड्रिक्स 29 धावा आणि एडन मार्कराम 23 धावांवर नाबाद राहिला.
UNBEATEN AND INTO THEIR FIRST-EVER MEN'S WORLD CUP FINAL 🎉
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 27, 2024
South Africa book their spot in Barbados for a shot at the #T20WorldCup title 🏆 https://t.co/ORQs8tENHx #SAvAFG pic.twitter.com/CiFr9czlqW
पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 11.5 षटकात 56 धावांत सर्व बाद झाला. आफ्रिकेकडून मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईनं सर्वाधिक 10 धावा केल्या. उमरझाई हा संघासाठी दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज होता.
𝗔 𝗗𝗢𝗠𝗜𝗡𝗔𝗡𝗧 𝗦𝗛𝗢𝗪! 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) June 27, 2024
South Africa storm into their first-ever #T20WorldCup FINALS courtesy of a thumping win over Afghanistan! 👊🏻
Onto #SemiFinal2 NOW 👉 #INDvENG | TODAY, 6 PM | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/xPnIOB3656
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. राशिद खानने घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिलं नाही. सुरुवातीपासूनच आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपला दबदबा ठेवला होता.
Game. Set. Final Bound. 🇿🇦#ReezaHendricks finishes in style as South Africa extends their unbeaten streak, reaching their first-ever #T20WorldCup final! 👊🏻
— Star Sports (@StarSportsIndia) June 27, 2024
Onto #SemiFinal2 NOW 👉 #INDvENG | TODAY, 6 PM | #T20WorldCupOnStar pic.twitter.com/03Zevhmot6
अफगाणिस्तानची फलंदाजी : प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानला पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिला धक्का स्टार सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने बसला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 8 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने (09) धावा करत गुलबदिन नायब बाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकात अफगाणिस्ताननं दोन विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी डावातील चौथे षटक आणणाऱ्या कागिसा रबाडानं पहिल्या चेंडूवर इब्राहिद झद्रान (02) आणि नंतर चौथ्या चेंडूवर मोहम्मद नबी (00) याला बाद केलं. त्यानंतर पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संघाला पाचवा धक्का नांगेलिया खरोटे (00) च्या रूपानं बसला.
After winning the toss, nothing else went right for Afghanistan 😮
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 27, 2024
This is also their LOWEST total in T20I cricket ❌ https://t.co/ORQs8tENHx #T20WorldCup #SAvAFG pic.twitter.com/oZoujwcY9I
यानंतर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईच्या रूपानं संघाने सहावी विकेट गमावली, ज्यानं 12 चेंडूंत 2 चौकारांसह 10 धावा केल्या. त्यानंतर 10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर करीम जनात 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर त्याच षटकातील 5व्या चेंडूवर नूर अहमद खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेला कर्णधार राशिद खान 8 धावा करत बाद झाला.
South Africa land a knockout punch 👊#SAvAFG #T20WorldCup pic.twitter.com/x3HCcvMmv0
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 27, 2024
दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी : दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतले. यादरम्यान जेन्सेनने 3 षटकांत 16 धावा तर शम्सीने 1.5 षटकांत केवळ 6 धावा दिल्या. याशिवाय कागिसो रबाडा आणि एनरिक नोर्सियाने प्रत्येकी 2 विकेट घेतले.
अफगाणिस्तानच्या नावावर लज्जास्पद विक्रम : या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान संघाने पॉवर प्लेमध्येच 5 विकेट गमावल्या. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात असं यापूर्वी कधीही घडलं नव्हतं. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पॉवरप्लेमध्ये 5 विकेट्स गमावणारा अफगाणिस्तान पहिला संघ ठरला आहे.
विश्वचषकात सर्वात कमी धावसंख्या : टी-20 क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. 2021 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडचा संघ 55धावांत सर्वबाद झाला होता. अफगाणिस्तान सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊट होणारा दुसरा संघ ठरला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 56 धावांत सर्वबाद झाला.
दोन्ही संघ
- अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (क), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, नजीबुल्लाह झदरन.
- दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (क), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जेन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.
हेही वाचा
- भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना पावसात वाहून गेल्यास भारतीय संघ जाणार थेट अंतिम फेरीत, काय आहे नियम? - T20 World Cup 2024
- ऑलिम्पियन कविता राऊतसह अनेक खेळाडूंचा पदकं परत करण्याचा राज्य सरकारला इशारा, बेमुदत उपोषणही करणार, कारण काय? - Sportspersons Demands
- आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल; आता 'या' दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान - Asia Cup 2024 Schedule