नवी दिल्ली Team India in Pakistan : भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करावा अशी प्रत्येक पाकिस्तानी इच्छा असते. तरी रिपोर्ट्सनुसार, भारत हायब्रीड मॉडेलबद्दल बोलत आहे आणि भारतानं कोणत्याही किंमतीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये यावं अशी पाकिस्तानची इच्छा आहे.
Champions Trophy 2025: Harbhajan Singh while answering whether the Indian team will go to Pakistan or not, said that if complete security is provided, India can tour Pakistan. The Champions Trophy 2025 is scheduled to be held in Pakistan between February and March. In such a… pic.twitter.com/auYerLPbj9
— Vivek Kumar Mishra🇮🇳 (@vivek23mishra) September 1, 2024
उच्चस्तरीय सुरक्षा पुरवत असल्यास पाकिस्तानला जावं : टी 20 विश्वचषक 2024 मध्ये विजेते झाल्यानंतर, भारताचं पुढील लक्ष्य आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत भारत चॅम्पियन ट्रॉफी खेळणार असल्याचं जय शाह यांनी आधीच सांगितलं आहे. आता पाकिस्तानकडून आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारत शेजारील देशात जाणार का, हा प्रश्न आहे. माजी फिरकीपटू तथा आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगनं भारताच्या पाकिस्तान दौऱ्याची मागणी केली आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं जर पाकिस्तान सुरक्षेसाठी उच्चस्तरीय सुरक्षा पुरवत असेल, तर भारतानं पाकिस्तानला जावं, असं म्हटलं आहे. संघाच्या सुरक्षेची खात्री होत नसेल तर संघानं पाकिस्तानात जाऊ नये, असंही हरभजन सिंगनं म्हटलं आहे. संघांना पूर्ण सुरक्षा मिळेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असेल, तर सरकारनं याचा विचार करून अखेर निर्णय घ्यावा. तसंच ही बाब केवळ क्रिकेटशी संबंधित नाही, तर याच्याही पुढं असल्याचं भज्जी म्हणाला.
सरकारनं परवानगी दिली तर जाऊ : मला असं वाटतं की सुरक्षेची चिंता नेहमीच असते आणि जर खेळाडूंच्या सुरक्षेची खात्री केली जात नसेल तर संघानं तिथं जावं असं मला वाटत नाही. माजी पाकिस्तानी यष्टीरक्षकाचा असा विश्वास आहे की जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर भारताचा पाकिस्तान दौरा जवळपास निश्चित झाला आहे, तर भारतीय क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, जर सरकारनं परवानगी दिली तर भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात नक्की जाईल.
हेही वाचा :