जेद्दाह Jitesh Sharma Salary Hike by 5500 Percent : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या हंगामापूर्वी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात खेळाडूंचा मेगा लिलाव सुरु आहे, ज्यात भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होताना दिसत आहे. यात एक नाव भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माचं देखील आहे, जो मागील आयपीएल हंगामात पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना दिसला होता, आता तो पुढील सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु म्हणजेच आरसीबी संघाकडून खेळताना दिसणार आहे. जितेश शर्माच्या आयपीएल पगारावर नजर टाकली तर त्यात मोठी वाढ झाली आहे, जी तुम्हाला तुमच्या पगारात कधीच मिळणार नाही.
Jitesh Sharma will play BOLD for @RCBTweets 🙌🙌
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
He's acquired for INR 11 Crore! 💪#TATAIPLAuction | #TATAIPL
आरसीबीनं 11 कोटी रुपयांत केलं खरेदी : IPL 2025 च्या मेगा लिलावात जितेश शर्माला विकेटकीपर बॅट्समन स्लॉटमध्ये स्थान मिळालं, ज्यात त्याची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती. जेव्हा त्याचं नाव पुकारलं गेलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्जनं त्याला घेण्यास स्वारस्य दाखवलं, ज्यात आरसीबीनं सुरुवातीपासूनच जितेशला घेण्याचं मन बनवलं होतं. यानंतर आरसीबीनं जितेश शर्माबाबत लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सशी बोलीबाजी केली होती, जी 7 कोटींवर थांबली होती. यानंतर, पंजाब किंग्ज, ज्याचा भाग जितेश होता, त्यांनी आरटीएम वापरण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीनं जितेशची किंमत थेट 11 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आणि पंजाबनं त्याला घेण्यास नकार आणि अशा प्रकारे आरसीबीनं जितेशला त्यांच्या संघाचा भाग बनविण्यात यश मिळविलं.
Power hitter, Sharma Ji Ka beta and a KEEPER. 😍
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 24, 2024
We can't keep calm cause Jitesh Sharma is #NowARoyalChallenger! 🔥#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPLAuction #BidForBold #IPL2025 pic.twitter.com/CZ5fjgqjsa
2022 मध्ये केलं पदार्पण : जितेशबद्दल बोलायचं झालं तर तो 2016 आणि 2017 च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर 2022 मध्ये जितेशला पंजाब किंग्सनं 20 लाख रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केलं आणि त्याच मोसमात त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधीही मिळाली. इथून पुढं जितेशनं मागं वळून पाहिलं नाही आणि आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं. जितेश शर्माचा आयपीएलचा गेल्या मोसमातील पगार 20 लाख रुपये होता, त्यानंतर तो आता थेट 11 कोटी रुपये झाला आहे परिणामी त्याच्या पगारात तब्बल 5500 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Jitesh makes a splash! 😎 😎
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
He goes the #RCB way for INR 11 Crore 👏 👏#TATAIPLAuction | #TATAIPL | @jiteshsharma_ | @RCBTweets pic.twitter.com/vHuGazwAS4
जितेश शर्माची कामगिरी कशी : 31 वर्षीय जितेश शर्माच्या आयपीएलमधील कामगिरीवर नजर टाकली तर त्यानं 40 सामन्यांमध्ये 22.81 च्या सरासरीनं 730 धावा केल्या आहेत, ज्यात एकही अर्धशतक खेळी नाही, परंतु खालच्या क्रमवारीत फलंदाजी करताना जितेशनं संघात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएलमध्ये जितेशचा स्ट्राईक रेट 151.14 आहे.
हेही वाचा :