ETV Bharat / spiritual

12 राशींसाठी कसा राहील नवीन आठवडा?; वाचा साप्ताहिक राशीभविष्य - WEEKLY HOROSCOPE

मेष ते मीन राशींसाठी नेमका कसा असणार नोव्हेंबरचा आठवडा, जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2024, 5:24 PM IST

मेष (Aries) : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी असू शकतो. आठवड्याच्या सुरूवातीस कामाची व्यस्तता संभवते आणि त्यामुळं आपणास अतिरिक्त काम करण्याची गरज भासू शकते. त्यासाठी आपणास अतिरिक्त परिश्रम करावे लागतील. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असू शकतो. व्यापारी वर्गास त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रकृती काहीशी नाजूक राहण्याची शक्यता असल्यानं आपणास आपल्या दिनचर्येवर आणि आहारावर लक्ष ठेवावं लागेल. परदेशात कारकीर्द घडविण्याच्या किंवा व्यापार सुरु करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. प्रणयी जीवनात घाई-घाईत किंवा भावनेच्या आहारी जाऊन उचलेले पाऊल आपणास त्रासदायी होऊ शकते. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी आपणास जोडीदाराच्या गरजांवर लक्ष द्यावं लागेल.

वृषभ (Taurus) : हा आठवडा अनिश्चिततेचा असण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतार होत असल्याचं दिसून येईल. त्यासाठी त्यांना सतर्क राहावं लागेल. आठवड्याच्या मध्यास आपणास अनपेक्षितपणे एखादा प्रवास करावा लागू शकतो. परंतु त्यासाठी आपणास थोडी वाट सुद्धा पाहावी लागू शकते. आपण जर दीर्घ काळापासून कारकीर्द सुरु करण्याच्या प्रयत्नात असाल तर आपले लक्ष्य गाठण्यासाठी आपणास अजून थोडी वाट पाहावी लागू शकते. नोकरी करणाऱ्याना आठवडाभर आपले सहकारी आणि वरिष्ठ ह्यांच्याशी मिळून - मिसळून काम करावे लागेल. प्रवासा दरम्यान आपल्या सामानाची आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. परीक्षा किंवा स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत करूनच यश प्राप्ती होईल. प्रणयी जीवनातील गैरसमज एखाद्या महिला मित्राच्या मध्यस्थीने दूर केले जाऊ शकतात. असं असलं तरी पुनर्विश्वास स्थापित होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

मिथुन (Gemini) : आठवड्याच्या सुरूवातीस आपणास एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची मदत होऊन आपले दीर्घ काळापासून स्थगित असलेले काम पूर्ण होईल. सत्ता आणि शासनाशी संबंधित व्यक्ती आपणास पूर्ण सहकार्य करतील. आठवड्याच्या मध्यास आपणास आपल्या कार्यक्षेत्री सतर्क राहावं लागेल. ह्या दरम्यान आपल्या प्रगतीवर जळणाऱ्या व्यक्ती आपणास त्रास देण्याची संभावना आहे. जमीन-जुमल्याशी संबंधित वाद संपुष्टात येतील. आपण जर भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आपणास आपल्या आर्थिक बाबींविषयी स्पष्टता करून वाटचाल करावी लागेल. परीक्षा-स्पर्धेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या शुभचिंतकांचा सल्ला घेणं हितावह होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. दांपत्य जीवन सुखद होईल.

कर्क (Cancer) : आठवड्याच्या सुरूवातीस आपणास एखादे मोठे यश मिळू शकते, परंतु ह्या यशाच्या आनंदात आपणास सतर्क राहावं लागेल. कोणत्याही प्रकारची जोखीम असेल अशा ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करणे आपणास टाळावे लागेल. अन्यथा भविष्यात आपणास नुकसान सोसावे लागू शकते. ह्या आठवड्यात आपली पदोन्नती किंवा बदली होऊ शकते. आपल्या कार्यक्षेत्री वरिष्ठ आणि कनिष्ठ असे दोघेही आपली प्रशंसा करतील. जमीन किंवा घर विक्रीतून आपणास लाभ होईल. कुटुंबाशी संबंधित महत्वाचा निर्णय घेताना आपणास माता-पित्यांचे पूर्ण सहकार्य आणि समर्थन मिळेल. आपण जर परदेशात कारकीर्द घडविण्याचा किंवा व्यापार करण्याचा विचार करत असाल तर त्यात येणारे अडथळे दूर होतील. आठवड्याच्या अखेरीस आपण मित्र किंवा कुटुंबियांसह एखाद्या सहलीचं प्रयोजन करू शकाल. प्रेमसंबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.

सिंह (Leo) : ह्या आठवड्यात आपणास प्रकृती आणि संबंध ह्याकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. आपल्या कामावर प्रकृती अस्वास्थ्याचा प्रभाव पडू शकतो. एखादी संधी हातून निसटल्यानं आपणास दुःख होऊ शकते. आपली एखादी लहानशी चूक आपली प्रतिष्ठा मलीन करू शकते, हे ध्यानात ठेवावे. ह्या दरम्यान आपणास विरोधकांपासून सुद्धा सतर्क राहावं लागेल. आठवड्याच्या अखेरीस जमीन-घर ह्यांच्याशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्यक्षेत्री सतर्क राहावं लागेल. प्रणयी जीवनात विचारपूर्वक पाऊल उचलावे. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. आपल्या जोडीदाराच्या खाजगी आयुष्यात घाई-घाई किंवा अत्याधिक प्रेम दर्शवणे टाळा. अन्यथा आपल्या संबंधात कटुता निर्माण होऊ शकते.

कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी शुभ आणि सौभाग्यदायी आहे. आठवड्याच्या सुरूवातीस आपणास पूर्वी केलेल्या एखाद्या कामामुळं सन्मानित केलं जाऊ शकतं. आपल्यावर एखादी मोठी जवाबदारी सुद्धा सोपविण्यात येऊ शकते. बाजारात आलेल्या तेजीचा लाभ घेण्यात आपण यशस्वी व्हाल. आपली प्रतिष्ठा सुद्धा वृद्धिंगत होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांना अनुकूल आहे. आपण जर दीर्घ काळापासून व्यापार विस्तार करण्याचा विचार करत असाल तर आपली हि मनोकामना ह्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना आठवड्याच्या अखेरीस एखादी ऑफर मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आपण सुख-सोयींशी संबंधित एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकता. त्यामुळं आपल्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. प्रेमिकेच्या सहवासात आपणास हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल.

तूळ (Libra) : ह्या आठवड्याच्या सुरूवातीस आपली थोडी धावपळ होण्याची संभावना आहे. अशा परिस्थितीत आपणास धीरानं कामे करावी लागतील. एखाद्या वादामुळं आपणास कोर्ट - कचेरी करावी लागू शकते. अशा वेळी सामंजस्य दाखवून कोर्टाच्या बाहेर वाद सोडविणे योग्य होईल. आठवड्याच्या सुरूवातीस लहान भावंडांशी झालेल्या वादामुळं आपणास मानसिक त्रास होऊ शकतो. तेव्हा बोलताना आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवावं. कार्यक्षेत्री लोकांच्या लहान-सहान गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याकडं दुर्लक्ष करावं. आठवड्याच्या उत्तरार्धात कारकीर्द किंवा व्यवसायानिमित्त प्रवास करावे लागू शकतात. परंतु त्यात लाभ अपेक्षेहून कमी होऊ शकतो. आपणास जर एखाद्या समोर आपल्या प्रेमाची कबुली द्यावयाची असेल तर थोडा धीर धरा. योग्य वेळ आल्यावर आपल्या प्रेमाची कबुली द्या, अन्यथा आपण झिडकारले जाऊ शकता. पूर्वीपासून असलेले प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवनसुखद होईल.

वृश्चिक (Scorpio) : आठवड्याच्या सुरूवातीस आपण पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आणि परिश्रमांचे सुखद परिणाम बघण्याची संधी मिळू शकते. आपणास कारकीर्द आणि व्यवसायाशी संबंधित एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते. असं असलं तरी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्री विरोधकांपासून सतर्क राहावं लागेल. अन्यथा ते आपल्या कामात खोडा घालू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. ते जर एखाद्या परीक्षेची किंवा स्पर्धेची तयारी करत असतील तर त्यांना कठोर परिश्रम करूनच अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल. प्रणयी जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं कटुता निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत आपण कोणताही वाद न घालता संवादाने दूर करण्याचा प्रयत्न करावा. आठवड्याच्या अखेरीस आपण वैवाहिक जोडीदारासह देवीच्या दर्शनास जाण्याचा कार्यक्रम आखू शकता. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती आपल्या चिंतेस कारणीभूत ठरू शकते. तेव्हा आपणास त्यांची काळजी घ्यावी लागेल.

धनु (Sagittarius) : हा आठवडा आपणास अत्यंत लाभदायी होण्याची संभावना आहे. आपण जर आपल्या वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य नियोजन केले तर आपणास खूप मोठे यश आणि लाभ प्राप्त होऊ शकतो. ह्या आठवड्यात प्रतिष्ठित व्यक्तींशी आपल्या ओळखी वाढतील आणि त्यांच्या मदतीनं आगामी काळात लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी आपणास मिळेल. नोकरी करणाऱ्या महिलांना मोठे यश मिळाल्यानं कार्यक्षेत्री आणि कुटुंबात त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. विवाहेच्छुकांना ह्या आठवड्यात विवाहासाठी स्थळे येऊ शकतील. प्रेमसंबंधात प्रगल्भता येऊ शकते. कदाचित आई-वडिल आपल्या प्रेम संबंधाचा स्वीकार करून विवाहास संमती देऊ शकतील. आठवड्याच्या अखेरीस मातेची प्रकृती आपल्या काळजीस कारणीभूत ठरू शकते. तेव्हा आपण त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वाहन सुरक्षितपणे चालवावे.

मकर (Capricorn) : हा आठवडा जवाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जास्त धावपळ आणि परिश्रम करण्याचा असू शकतो. आठवड्याच्या सुरूवातीस घर दुरुस्ती आणि इतर कार्यात आपण जास्त व्यस्त असू शकता. ह्या आठवड्यात आपल्या आर्थिक स्थितीस प्रभावित करेल असे काही मोठे खर्च अचानकपणे होऊ शकतात. आपण जर रोजगाराच्या शोधात असाल तर आपणास अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर कार्यक्षेत्री अचानकपणे भार वाढू शकतो. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी असलेल्या मतभेदांचे रूपांतर मनभेदात होऊ देऊ नका. कौटुंबिक समस्या संवादानं दूर करण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात काही कारणानं आपल्या प्रणयी जीवनात गैरसमज होण्याची संभावना आहे. कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची बिघडलेली प्रकृती आपल्या चिंतेचा विषय होऊ शकते.

कुंभ (Aquarius) : ह्या आठवड्यात आपणास आळस आणि अहंकार झटकावा लागेल. कामे उद्यावर ढकलण्याचे आपणास टाळावे लागेल. अन्यथा आपलेच नुकसान होऊ शकते. जमीन-घर ह्यांच्याशी संबंधित वाद कोर्टात नेण्याऐवजी आपसात संवाद साधून सोडवणे हितावह होईल. आठवड्याचा मध्य व्यवसायास प्रतिकूल असू शकतो. ह्या दरम्यान आर्थिक देवाण - घेवाण करताना सतर्क राहावे. कोणत्याही योजनेत किंवा व्यापारात आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी, अन्यथा नंतर आपणास नुकसान सोसावे लागू शकते. प्रवासा दरम्यान आपले सामान व प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रणयी संबंधात सावध राहावे. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या गरजा दुर्लक्षित करू नये.

मीन (Pisces) : ह्या आठवड्यात परिश्रम करूनच यश प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्यांनी स्वतःचे काम स्वतःच करावे. त्यांनी कोणावरही अवलंबून राहू नये, अन्यथा आपणास वरिष्ठांच्या क्रोधास सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध होतील. आठवड्याची सुरूवात काहीशी संथ झाली तरी उत्तरार्धात व्यावसायिक लोकांना अपेक्षित लाभ मिळू शकेल. ह्या दरम्यान बाजारातील तेजीचा लाभ आपण घेऊ शकाल. त्यामुळं आपल्या संचित धनाची वृद्धी होईल. प्रेमसंबंध दृढ होतील. आपण प्रेमिकेशी उत्तम समन्वय साधू शकाल. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपणास आपल्या प्रकृतीची आणि संबंधांची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या सुरूवातीस ऋतुजन्य विकार किंवा जुने आजार उफाळून येण्याची संभावना असल्यानं आपल्या प्रकृतीवर लक्ष द्यावे.

हेही वाचा -

साईंच्या मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन, पाच कोटींच्या आभूषणांनी साईंना मढवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.