मेष : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात जरी सुख - शांती असली तरी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळं जीवन तणावयुक्त असल्याचं दिसून येईल. प्रणयी जीवनात सुद्धा चढ - उतार असल्याचं दिसून येईल. ज्यांना एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयाची आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. शेअर बाजारात मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करावी. नोकरीत बदल करण्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. अति आत्मविश्वास टाळावा. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी स्पर्धेत यशस्वी होतील. आपण आपल्या व्यस्त जीवनातून सुद्धा कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढाल, त्यामुळं आपण त्यांच्याशी सुख - दुःखाच्या गोष्टी करताना दिसून येईल. स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी काही खरेदी कराल. खरेदी करताना मात्र आपणास अंदाजपत्र बनवावे लागेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. सर्वजण एकत्रितपणे कामे करत असल्याचं दिसून येईल. भावाच्या विवाहावर शिक्कामोर्तब झाल्यानं कुटुंबात मंगल कार्याचं आयोजन होईल. सर्वांची ये-जा चालू होईल. प्रणयी जीवनात काही कारणाने तणाव असल्याचं दिसून येईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. स्पर्धेत यश प्राप्ती होईल. मुलांच्या शिक्षणावर जास्त प्रमाणात पैसा खर्च होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यालयीन कामा निमित्त प्रवास सुद्धा करावं लागतील. व्यापार वृद्धी करण्यात यशस्वी होता येईल. प्रकृतीत हळू - हळू सुधारणा होईल. प्रकृतीत जर चढ - उतार होत असले तर एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वैवाहिक जोडीदारासह आपण काही सुखद क्षण व्यतीत करताना दिसून येईल. मुलांचे सहकार्य मिळेल.
मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. आपल्यावर कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी येण्याची संभावना असून आपण त्याने काहीसे त्रस्त झाल्याचं दिसेल. घराची सजावट आणि दुरुस्तीसाठी काही पैसे खर्च कराल, मात्र खर्च नियंत्रणात ठेवणं आपल्या हिताचं होईल. नोकरीत स्थान परिवर्तन संभवते. व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल, मात्र मन विचलित होऊ न देण्याची दक्षता आपणास घ्यावी लागेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रकृतीत पूर्वी पेक्षा जास्त सुधारणा होईल. बहिणीच्या विवाहावर शिक्कामोर्तब झाल्याने कुटुंबात मंगल कार्यक्रमाचं आयोजन होईल. कुटुंबियांसह खरेदीस जाल.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती असल्याचे दिसून येईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवाल. या आठवड्यात आपल्या प्रेमिकेची भेट झाल्याने आपण अत्यंत खुश व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. भविष्यात उपयोगी होण्यासाठी आपण आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. व्यापारी व्यवसाय वृद्धीसाठी खूप प्रयत्न करत असल्याचं दिसून येईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल.
सिंह : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. वैवाहिक जोडीदार भरपूर सहकार्य करेल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. व्यवसाय वृद्धीसाठी आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची संभावना सुद्धा आहे. धन संचय कसा करावा हे आपण वरिष्ठांकडून शिकून घ्याल. पैतृक व्यवसायात काही बदल होऊन त्यात वृद्धी होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. जे विद्यार्थी स्पर्धेसाठी तयारी करत आहेत त्यांना आपले परिश्रम वाढवावे लागतील. प्रकृतीत हळू - हळू सुधारणा होईल. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी आपण आपल्या परिचितांशी बोलणी करत असल्याचे दिसून येईल. विवाह इच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवते.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. जीवनात सुख - शांती नांदेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपण थोडा वेळ कुटुंबियांच्या सहवासात व्यतीत करून आपणास भविष्यात उपयोगी होऊ शकतील, अशा बऱ्याच गोष्टी शिकाल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने आपली प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. धन लाभ संभवतो. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. या आठवड्यात आपण काही गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल, परंतु आपणास खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. वैवाहिक जोडीदारासह रोमँटिक रात्री भोजनास जाल.
तूळ : हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. प्रणयी जीवनात माधुर्य राहील. वैवाहिक जोडीदारासह आपण सुखद क्षण घालवू शकाल. कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. मुलांच्या उत्तरदायित्वाची पूर्तता होईल. विद्यार्थी शिक्षणासाठी एका देशातून दुसऱ्या देशात सुद्धा जाऊ शकतील. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यापारी व्यापार वृद्धी करण्यात यशस्वी होतील. ह्या आठवड्यात आपण जर आपल्या खर्चाचे अंदाजपत्र तयार केलेत तर ते हितावह होईल. ह्या आठवड्यात अचानकपणे आपणास काही अवांछित खर्च करावे लागतील. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मदतीने आपली थकबाकी सुद्धा मिळेल. स्वतःसाठी एखादे वाहन सुद्धा आपण खरेदी करू शकता. घर किंवा एखादी जमीन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.
वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. ह्या आठवड्यात वरिष्ठांकडून आपणास काही कौटुंबिक जवाबदारी सोपविण्यात येईल, त्यामुळं आपण काहीसे त्रस्त झाल्याचं दिसाल. आपण कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास करण्याचं आयोजन सुद्धा कराल. प्रकृतीत चढ - उतार येतील. विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकतात. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. धन लाभ संभवतो. या आठवड्यात आपणास आपली थकबाकी मिळू शकेल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्ती होईल. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील, ज्या व्यापार वृद्धीसाठी त्यांना उपयुक्त होऊ शकतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. घरात मंगल कार्यक्रमाचं आयोजन होईल. नव्या पाहुण्याच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसेल.
धनु : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. आपले प्रणयी जीवन सुखद होईल. आर्थिक स्थितीत चढ - उतार येतील. खर्चात वाढ झाल्यानं आपण त्रस्त झाल्याचं दिसेल. प्रकृतीमुळं सुद्धा खर्चात वाढ होऊ शकते. मुलांच्या अभ्यासावर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांची पद - प्रतिष्ठा उंचावत असल्याचे दिसेल. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील, त्यामुळं व्यापार वृद्धी करण्यात ते यशस्वी होतील. विद्यार्थी मन लावून अध्ययन करताना दिसतील. स्पर्धेत सुद्धा यश प्राप्त होईल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे संपुष्टात येतील. पैतृक संपत्तीत धनलाभ होईल. जमीन - जुमल्यात गुंतवणूक केल्यास फायदा होईल.
मकर : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. आपण आणि आपला वैवाहिक जोडीदार या दरम्यान भरपूर आकर्षण सुद्धा राहील. आपल्या नात्यात प्रेम आणि विश्वास असल्याचं दिसेल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेसह रोमँटिक रात्री भोजनास जाऊन तेथे प्रेमाच्या गप्पागोष्टी करताना दिसतील. ते एकमेकांना भेटवस्तू सुद्धा देऊ शकतील आणि त्यामुळं दोघातील प्रेम आणि विश्वास वृद्धिंगत होईल.
कुंभ : हा आठवडा आपणास अनुकूल आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. सर्वजण एकजुटीने कामे करताना दिसतील. भावाच्या विवाहात येत असलेले अडथळे संपुष्टात येतील. घरात मांगलिक कार्यक्रमाचं आयोजन होईल, ज्यात सर्वांची ये - जा होईल. कुटुंबातील सर्वजण खरेदीसाठी जाऊन खूप मौज - मजा करताना दिसतील. प्रकृतीत चढ - उतार येतील. दिनचर्येत काही बदल केल्यास ते आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. खर्चात वाढ होईल. ह्या आठवड्यात प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचा विचार आपण करू शकता. व्यापाऱ्यांना इच्छित लाभ झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होईल.
मीन : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात सुख - शांती नांदेल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवू शकाल. प्रणयी जीवन सुखावह होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. ज्यामुळं आपण व्यवसायात यशस्वी होऊ शकाल असे नव - नवीन संपर्क व्यापारात प्रस्थापित होतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल, ज्यात पगारवाढ व पदभार जास्त असेल. आपण स्वतःसाठी व कुटुंबियांसाठी काही गरजेच्या वस्तूंची खरेदी कराल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. ज्या व्यक्ती शासकीय नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांना यश प्राप्त होईल. घर - जमीन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. प्रकृतीत पूर्वीपेक्षा जास्त चांगली सुधारणा होईल. घरात भजन - कीर्तन इत्यादींचं आयोजन झाल्यामुळं अनेक लोकांची ये-जा होईल. आपल्या वाणीत माधुर्य टिकवून ठेवावे.
हेही वाचा -