ETV Bharat / spiritual

'या' राशीच्या प्रियकराला मिळेल 'चॉकलेट डे'ला खास भेटवस्तू?; वाचा राशीभविष्य - Rashi Bhavishya For 09 February

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 09 फेब्रुवारी 2024 चे राशी भविष्यात.

Today Horoscope
राशीभविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 1:34 AM IST

  • मेष : आज चंद्र मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडं लक्ष द्याल आणि त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिक दृष्टया विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्यावा. कामाच्या व्यापामुळं कामात दिरंगाई होईल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
  • वृषभ : आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज परदेशस्थ स्नेहीजनांकडून आणि मित्रवर्गाकडून आनंददायी बातम्या मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणाऱ्यांना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एखाद्या प्रवासामुळं आनंद होईल. नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढला तरी सुद्धा आर्थिक लाभाची शक्यता आहे.
  • मिथुन : आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळं स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्यानं डोकं शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणं हेच आपल्या हिताचं आहे. अतिरिक्त खर्चामुळं आर्थिक चणचण जाणवेल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.
  • कर्क : आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मित्र आणि स्वकियांच्या सहवासात आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल जो दीर्घकाळ स्मृतीत राहील. समाजात मान - सन्मान वाढेल.
  • सिंह : आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. केलेल्या कष्टाचे श्रेय न मिळल्याने मन उदास होईल.
  • कन्या : आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील. सट्टा - शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत भाग घेऊ नये.
  • तूळ : आपल्या राशी पासून चंद्र चौथा स्थानी असेल. आज शारीरिक थकवा आणि मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. आई विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल. एखादी मानहानी संभवते.
  • वृश्चिक : आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रांबरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल.
  • धनू : आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्यानं मन हताश होईल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय न घेणं उचित ठरेल. घरी आणि नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढेल.
  • मकर : आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खूष होतील. कामे सहजपणे पार पडतील. अनुकूल परिस्थितीचा आपण फायदा करून घ्यावा. मन शांत राहील. शारीरिक कष्ट होतील.
  • कुंभ : आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज मन आणि शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. वाणी आणि रागावर संयम ठेवावा लागेल. एखादा अपघात संभवतो.
  • मीन : आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. संततीकडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल आणि त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. एखाद्या रमणीय स्थळाला भेट द्याल.

हेही वाचा -

  1. 'या' दोन राशींना मिळणार भाग्याची साथ; वाचा राशीभविष्य
  2. लव्ह बर्ड्ससाठी कसा असेल व्हॅलेंटाईन वीक? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.