ETV Bharat / spiritual

नरक चतुर्दशी 2024: 'मेष ते मीन' राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 30 OCTOBER 2024

दिवाळीची सुरूवात झाली आहे. आज नरक चतुर्दशी आहे. तर 12 राशींसाठी कसा असेल आजता दिवस, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 6:39 PM IST

  • मेष (ARIES) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख आणि संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणं आवश्यक आहे. वैचारिकदृष्टया उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अतिरिक्त लाभ होण्याची शक्यता आहे.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. वाणीच्या प्रभावानं इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल आणि मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानानं फळ मात्र कमी मिळेल. तरीही निश्चयपूर्वक पुढे जात राहाल. आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आई आणि स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे व्हाल. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. प्रवाही पदार्थांपासून सावध राहावं लागेल. मानसिक ताण राहील.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. भोजन अवेळी होईल. निद्रानाशाचा त्रास होईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.
  • सिंह (LEO) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचे ठरवाल. मानसिक दृष्टया चिंतामुक्त व्हाल. कार्य़ यशस्वी होईल.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना मात्र आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आपण आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळं हाती घेतलेलं काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, हर्ष आणि मनोरंजनावर पैसा खर्च होईल.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावेत. आपल्या वक्तव्यानं एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट आणि मानसिक चिंता ह्यामुळं त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. प्राप्तीत वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी आहे. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र आणि संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. मात्र अग्नी, पाणी, अचानक आपत्ती ह्यापासून सावध राहावं लागेल. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळं समाधान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. शरीरात स्फूर्तीचा अभाव असल्यानं काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. करमणुकीसाठी पैसा खर्च होईल. प्रवास संभवतात. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल. संततीची मात्र चिंता निर्मण होईल.
  • मीन (PISCES) : आज चंद्र रास बदलून कन्या राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पडल्यानं दिवस आनंदात जाईल. आप्तेष्टांसह मेजवानी किंवा सहलीचे बेत आखाल. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल. यश आणि प्रसिद्धी वाढेल.

हेही वाचा -

  1. ठाण्यातील पर्यावरणभिमुख कंदील लागणार अमिताभ बच्चन, सलमान खानच्या दाराबाहेर
  2. यंदा कधी आहे दिवाळी; वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, तारीख
  3. मुंबईतून 176 देशांमध्ये निघाला दिवाळी फराळ; कोट्यवधींची होते उलाढाल, उद्योजकाने सांगितली 'ईटीव्ही न्यूज'ची खास आठवण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.