हैदराबाद Navratri 2024 : शारदीय नवरात्रीची (Shardiya Navratri) सुरुवात 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने होत आहे. तर 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा (Durga) आहे. दरवर्षी दुर्गा माता (Durga) जेव्हा येते तेव्हा ती वेगळ्या वाहनाने येते आणि त्यानुसार मातेच्या प्रस्थानाचे वाहन ठरवले जाते. दुर्गामाता कोणावर स्वार होऊन येणार आणि दुर्गेच्या प्रस्थानाचे वाहन कोणते असेल हे जाणून घेऊयात.
काय आहे आगमनासाठी स्वारी? : नवरात्रीला दुर्गा माताचं पृथ्वीवर आगमन होतं आहे. यावेळी माता दुर्गा पालखीत स्वार होऊन येत आहे. हे अशुभ मानलं जात आहे. पालखीत किंवा डोलीत होणारे आगमन हे अर्थव्यवस्थेतील घसरण, व्यवसायातील मंदी, हिंसाचार, साथीच्या रोगांमध्ये वाढ आणि अनैसर्गिक घटना दर्शवतात.
ही आहे प्रस्थानाची सवारी? : नवरात्रीच्या काळात मातेच्या प्रस्थानाची मिरवणूक ही वाराप्रमाणे ठरवली जाते. या वर्षी नवरात्रीची समाप्ती शनिवार, 12 ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामुळं दुर्गा माताची प्रस्थान सवारी कोंबडा असेल, जे की अशुभ आहे. हे दुःखाचं प्रतीक आहे. यामुळं या देशावर वाईट परिणाम होणार आहे. मारामारी, अंशतः साथीचे रोग पसरतील, नैसर्गिक आपत्ती, राजकीय उलथापालथही होऊ शकते.
'ही' आहेत माता दुर्गेची नऊ रूपे : नवरात्रीत शैलपुत्री देवी, देवी ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा देवी, कुष्मांडा देवी, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, कालरात्री देवी, देवी महागौरी, देवी सिद्धिदात्री या 9 देवीची पूजा केली जाते.
टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.
हेही वाचा -