ETV Bharat / spiritual

'या' पाच राशींवर असणार भगवान शंकरचा आशीर्वाद; वाचा राशी भविष्य - Today Horoscope - TODAY HOROSCOPE

Today Horoscope : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Today Horoscope
राशी भविष्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 5:31 AM IST

मेष : आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला आणि ताप यामुळं प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. मांगलिक आणि सामाजिक कार्यावर पैसा खर्च करावा लागेल.

वृषभ : आज आपली प्राप्ती व व्यापार यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय आणि मित्रांसह हसण्या - खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास - पर्यटनाचे योग आहेत. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन जवळीक वाढेल. भावंडे आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मिथुन : शरीर आणि मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्यानं कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी कामे सुद्धा सहजतेने पूर्ण होतील.

कर्क : आज आपण मंगल कार्य आणि परोपकारी कामात जास्त वेळ घालवाल. एखादा प्रवास संभवतो. शारीरिक आणि मानसिकदृष्टया प्रसन्न राहाल. नशिबाची साथ मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल. विदेश यात्रेची संधी लाभेल. नोकरदारांना लाभ होईल.

सिंह : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याकडं अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. आजारामुळं खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा. काळजी कमी होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.

कन्या : आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. आजचा दिवस भागीदारीसाठी अनुकूल आहे. प्रवास पर्यटनाची शक्यता आहे.

तूळ : आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रकृती उत्तम राहील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आजचा दिवस आर्थिक योजना बनविण्यासाठी अनुकूल आहे. परिश्रम प्रगति पथावर नेतील. संतती विषयक आनंददायी बातम्या समजतील. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील.

वृश्चिक : आज आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.

धनू : आज आपणात शारीरिक आणि मानसिक स्फूर्ती आणि उत्साह याचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश आणि कलहजन्य वातावरण राहिल्यानं मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. आईची प्रकृती बिघडेल. सार्वजनिक जीवनात अपमान होण्याचे प्रसंग येतील. धनहानी होईल. स्त्रीवर्गाकडून हानी संभवते. नदी, तलाव, समुद्र अशा जलाशयांपासून सांभाळून राहा.

मकर : आजचा दिवस सुखात जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानं आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होतील. भागीदारीत फायदा होईल. भावंडांसह वेळ खूप चांगला जाईल. एखादे नवे कार्य सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. मित्राच्या भेटीनं कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

कुंभ : आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळं निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. त्यामुळं विपरीत परिणाम होईल. प्रकृती सुद्धा साथ देणार नाही. वाणीवर ताबा न राहिल्यानं वाद-विवाद होऊन आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळेल. नाहक खर्च आणि धनहानी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील.

मीन : आज आपणास आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र आणि कुटुंबीय ह्यांच्यासह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. प्रवास संभवतात. आर्थिक लाभ होईल. परोपकारी कार्यावर खर्च होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. दांपत्य जीवनात सुख प्राप्ती होईल. कुटुंबात शांततेचं वातावरण पसरेल.

हेही वाचा -

  1. कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा?; वाचा साप्ताहिक राशी भविष्य 07 ते 13 एप्रिल - Weekly Horoscope
  2. ‘या’ राशीला व्यवसायात मिळेल यश, नोकरीत प्रगतीची संधी; वाचा राशी भविष्य - Today Horoscope
  3. 7 एप्रिल 2024 पंचांग : काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.