मुंबई Panchang 21 July 2024 : 21 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2024) म्हणून साजरा होत आहे. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचं काम केलं जातं. आपल्या जीवनात गुरुचे अन्यनसाधारण महत्त्व हे आहे. त्यामुळं गुरु पौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणी अनेक उपक्रमाचं आयोजन करण्यात येते.
दैनिक पंचांग : हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. पंचांगाच्या माध्यमातून वेळ आणि काळाची अचूक गणना केली जाते. मुळात पंचांग हे पाच भागांचे बनलेले असते. तिथी, नक्षत्र वार, योग आणि कारण हे पाच भाग आहेत. येथे आम्ही तुम्हाला दैनिक पंचांगमध्ये शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, तिथी, करण, नक्षत्र, सूर्य आणि चंद्राची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष इत्यादींबद्दल माहिती देतो. जाणून घेऊया आजचा शुभ मुहूर्त आणि राहुकाल वेळ, ज्योतिषी शिव मल्होत्रा यांच्याकडून आजचे पंचांग.
आजची तारीख : 21-07-2024 रविवार
आजची तिथी : पौर्णिमा
आजचे नक्षत्र :उत्तराषाढा
अमृतकाळ : 15:59 to 17:37
राहूकाळ : 17:37 to 19:15
सुर्योदय : 06:09:00 सकाळी
सुर्यास्त : 07:15:00 सायंकाळी
गुरुपौर्णिमेचे महत्व : (Significance of Guru Purnima) आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत होते. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळं गुरू पौर्णिमेला 'व्यास पोर्णिमा' असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा करतो.
हेही वाचा -