ETV Bharat / spiritual

'मेष ते मीन' सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य - Horoscope 14 September 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2024, 3:34 AM IST

Horoscope 14 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)
  • मेष (ARIES) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज नोकरीत वरिष्ठांबरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडं लक्ष द्याल आणि त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिकदृष्टया विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्यावा. कामाच्या व्यापामुळं कामात दिरंगाई होईल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज परदेशस्थ स्नेहीजनांकडून आणि मित्रवर्गाकडून आनंददायी बातम्या मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल. परदेशी जाण्यास इच्छुक असणाऱ्यांना चांगली संधी प्राप्त होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. एखाद्या प्रवासामुळं मनास आनंद होईल. नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढला तरी सुद्धा आर्थिक लाभाची शक्यता आहे.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळं स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्यानं डोकं शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. अतिरिक्त खर्चामुळं आर्थिक चणचण जाणवेल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस मित्र आणि स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल जो दीर्घकाळ स्मृतीत राहील. समाजात मान-सन्मान वाढेल.
  • सिंह (LEO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज आपलं मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. केलेल्या कष्टाचे श्रेय न मिळल्यानं मन उदास होईल.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संततीविषयी चिंता लागून राहील. सट्टा-शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत भाग घेऊ नये.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज शारीरिक थकवा व मानसिकदृष्टया आपण व्यस्त राहाल. आईविषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावं लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचं असेल. एखादी मानहानी संभवते.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रांबरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्यानं मन हताश होईल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय न घेणे उचित ठरेल. घरी व नोकरी - व्यवसायात कामाचा व्याप वाढेल.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज सकाळी आपलं मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खूष होतील. कामे सहजपणे पार पडतील. अनुकूल परिस्थितीचा आपण फायदा करून घ्यावा. मन शांत राहील. शारीरिक कष्ट होतील.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज मन, शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण-घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावं लागेल. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. वाणी व राग ह्यावर संयम ठेवावा लागेल. एखादा अपघात संभवतो.
  • मीन (PISCES) : आज चंद्र मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज अचानक धनलाभ संभवतो. संततीकडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्यानं आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. एखाद्या रमणीय स्थळाला भेट द्याल.

हेही वाचा -

गणपती बाप्पाच्या कृपेनं कसा जाईल सप्टेंबरचा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.