हैदराबाद Akshaya Tritiya 2024 : शुक्रवारी 10 मे रोजी 'अक्षय्य तृतीया' आहे. अक्षय्य तृतीया माता लक्ष्मीसाठी समर्पित दिवस आहे. हिंदु धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया होय. यादिवशी देवी लक्ष्मीला आपल्या घरी आणण्यासाठी लोक विविध पुजा करतात. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लोक सोने-चांदी, वाहन खरेदी करणं शुभ मानतात.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणं शुभ : अक्षय्य तृतीयेला प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार सोने-चांदी खरेदी करतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सोने खरेदी केल्यानं घरात धनसंपत्ती राहते आणि सुख-समृद्धी येते. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्यानं घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या दिवशी सोने खरेदी केल्यानं तुम्हाला वर्षभर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. तसेच अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यानं घरात धन वाढते.
अक्षय्य काय तृतीयेचं महत्त्व : अक्षय्य तृतीया हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ क्षय किंवा नाश नाही. ज्या गोष्टी कधीच संपत नाहीत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही शुभ कार्य करू शकता. या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि असं केल्यानं लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
कोणता आहे अक्षय तृतीयेचा मुहूर्त : अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी 7.14 ते 10.36 पर्यंत विशेष लाभदायक योग आहे. अभिजीत मुहूर्त 11:50 ते 12:44 पर्यंत आहे. 12:17 ते 1:58 दरम्यान शुभ योग आहे. जप, दान, तपश्चर्या, खरेदी, आदी या काळात अत्यंत शुभ राहील. यासोबतच अशुभ काळही लक्षात असू द्या. तो 10:45 ते 12:23 पर्यंत चालेल. यामध्ये कोणतंही शुभ कार्य करणं टाळलं तर बरं होईल, असंही भारत ज्ञान भूषण यांनी स्पष्ट केलं.
अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी टाळाव्यात : या अक्षय तृतीया या सणाला सूर्य आणि चंद्राला काही अशुभ दान करू नका. राहू आणि बुध यांच्याशी संबंधित दान करणं गरजेचं आहे. विशेषत: सत्तूचं दान करा, त्यासोबत भिजवलेला हरभरा दान करू शकता. छत्री, चप्पल, मोजे, शरबत दान करता येईल, मात्र फिकट पाणी दान करू नये. अक्षय्य तृतीयेला आपण दान वगैरे केले तर त्याचं फळ आपल्याला या जन्मात नक्कीच मिळते. पण, मोक्ष स्थिती प्राप्त होईल, हे गुण सदैव तुमच्यासोबत राहतील, असं सुप्रसिद्ध कर्मोलॉजिस्ट भारत ज्ञान भूषण यांनी यावेळी स्पष्ट केलं. या दिवशी इच्छा पूर्ण करण्यासाठी मातीच्या भांड्यात 11 आंब्याची पानं ठेवून मनोकामना सांगावी. सत्तूचं दान करण्यासोबतच त्याचं सेवन स्वतः करावं. ओल्या हरभऱ्याची फांदी भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करावी. अशा रितीनं हा प्रसाद आपल्या जीवनात अमृतमय होईल. आपल्या जीवनातून नकारात्मक प्रभाव नाहीसे होतील.
हेही वाचा -