मेष : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा असेल. आजचा दिवस खर्चाचा असल्यानं त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावं लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आप्तेष्टांशी मतभेद होण्याची आणि आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. एकंदरीत आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
वृषभ : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक आणि कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळं मन लावून काम कराल. आर्थिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल. अलंकार, सौंदर्य प्रसाधने आणि मनोरंजन यावर खर्च कराल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा असेल. आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळं तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र आणि कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपलं बोलणं किंवा व्यवहार यामुळं कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. एखादा अपघात संभवतो. आज आपला खर्च अधिक होईल. मानसिक चिंतेने मन त्रस्त होईल. वायफळ कामावर शक्ती खर्च होईल.
कर्क : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असेल. आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जोडीदार आणि संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीशी सुसंवाद साधू शकाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. चिंता दूर होतील. मित्रांसह एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
सिंह : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्याराशी पासून चंद्र दशमात असेल. खंबीर मन आणि दृढ निश्चय यामुळं प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. संपत्तीपासून लाभ होईल. कला आणि क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील. घराचा कागदोपत्री व्यवहार करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे,
कन्या : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य आणि प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र आणि संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळं आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांमुळं आर्थिक फायदा होईल.
तूळ : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात असेल. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. सरकार विरोधी कामे, राग इत्यादींपासून दूर राहणं हितावह राहील. शक्यतो नवीन संबंध जुळवू नये. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
वृश्चिक : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा असेल. आज दैनंदिन कामाकडं दुर्लक्ष करून आनंद-प्रमादात आपण व्यस्त राहाल. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाऊन मन प्रसन्न होईल. समाजात मान-सन्मान होतील. मित्र आणि कुटुंबियांशी हिंडणं-फिरणं आनंददायी ठरेल.
धनू : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा असेल. आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळं मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल. सहकाऱ्यांचं अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो.
मकर : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा असेल. आज आपले मन चिंतातुर आणि द्विधा अवस्थेत राहील. अशा मनःस्थितीत आपण कोणत्याही कामात खंबीरपणे निर्णय घेऊ शकणार नाही. नशिबाची साथ नसल्यानं आज कोणतेही महत्वाचे काम न करणं हितावह राहील. संततीच्या आरोग्याची काळजी राहील. वडिलधार्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. कार्यालयात वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च होतील. संततीशी मतभेद संभवतात.
कुंभ : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या असेल. आज मानसिक तणावामुळं ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने ह्यावर पैसा खर्च होईल. मातेकडून लाभाची शक्यता आहे. जमीन, घर आणि वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल. कोणत्याही गोष्टीत हट्टीपणा करू नका.
मीन : आज चंद्र वृषभ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली कलात्मक आणि सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दिवस आनंदात जाईल. मित्रांसह छोटीशी सहल आयोजित कराल. भावंडां कडून लाभ होईल. कार्यात यश मिळेल. मान- सम्मान होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
हेही वाचा -