ETV Bharat / politics

वरळी हिट अँड रन प्रकरण : मिहिर शाह आणि मुख्यमंत्र्यांचे व्यावसायिक संबंध, संजय राऊतांचा गंभीर आरोप - worli hit and run case - WORLI HIT AND RUN CASE

Sanjay Raut Criticized Government : वरळीतील हिट अँड रनच्या घटनेमुळं मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. या घटनेवरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत.

worli hit and run case Mihir Shah and Chief Minister Eknath Shinde has business relationship, Sanjay Raut serious allegation
एकनाथ शिंदे आणि संजय राऊत (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 2:02 PM IST

मुंबई Sanjay Raut Criticized Government : मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनची घटना घडलीय. या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील मुख्य आरोपी पालघरचे शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह अद्यापही फरार आहे. या मुद्द्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतानाच, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत. मुख्य आरोपी मिहिर शाह आणि मुख्यमंत्र्यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तसंच शाह त्यांच्या पक्षाचे उपनेते आहेत. म्हणून आरोपी अजूनही मोकाट असल्याचंही राऊत म्हणालेत.

आरोपीली गुजरातमध्ये लपवून ठेवले का : आरोपीच्या वडिलांना अटक झालीच कशी? पोलिसांनी त्यांना अटक करून गुन्हाच केला, अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी सरकारवर केली. एका मराठी महिलेला मिहिर शाहनं दारूच्या नशेत चिरडून ठार मारलं, तिची हत्या केली. तरी पण हा आरोपी फरार आहे. हा आरोपी मुंबई पोलिसांच्या तावडीतून सुटतो कसा? त्याला कुठं लपवलय? या आरोपीला सुरतमध्ये लपवून ठेवलंय की, गुवाहाटीला लपूवन ठेवलं? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा. एका मराठी कुटुंबाला दिवसाढवळ्या रक्तबंबाळ करून ठार मारलं जातं. त्यामुळं या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नाही, असंही ते म्हणाले.

अजित पवारांवरही साधला निशाणा : आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं यावर बोलताना राऊत म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे. सिद्धिविनायकाला पाप आणि पुण्य समजतं. पाप करुन, चोऱ्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येतं. हे सिद्धिविनायकला चांगलं कळतं. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जे पाप महाराष्ट्राच्या बाबतीत केलंय. ते पाहता सिद्धिविनायक त्यांना आशीर्वाद देईल, असं मला वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा -

  1. वरळी हिट अँड रन प्रकरण : राजकीय नेत्याचा मुलगा असल्यानं मिहिर शाहच्या अटकेला दिरंगाई, मृत महिलेच्या पतीचा गंभीर आरोप - Worli Hit and Run Case
  2. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शाह अजूनही फरारच, पोलिसांकडून लूक आऊट सर्क्युलर - Worli Hit and Run Case
  3. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या, मृत महिलेच्या पतीची मागणी; आरोपीनं मद्यप्राशन केल्याचा संशय - Worli Hit And Run Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.