मुंबई Uddhav Thackeray New Song :- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनातून पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात अराजकतेची स्थिती निर्माण झाल्याचं सांगत त्यांनी विरोधकांना टीकास्त्र डागलं आहे. आजपासून नवरात्री सुरू होत असून, सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आपण दसरा मेळाव्यात भेटणार आहोतच. पण आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाही. खरं तर राज्यात अराजकता माजली आहे, त्यावर घाव घालण्यासाठी आणि आसूड ओडण्यासाठी आम्ही एक गीत तयार केले आहे. राज्यातील तोतयागिरीचा नायनाट करण्यासाठी "असुरांचा संहार कराया, मशाल हाती दे.., सत्वर भूवरी ये गं अंबे..., सत्वर भूवरी ये.." हे गीत तयार केले आहे. या गाण्याचे गीतकार श्रीरंग गोडबोले असून, आपल्या पहाडी आवाजात नंदेश उमप यांनी हे गाणे गायले आहे. तर संगीतकार राहुल रानडे यांनी गाण्याला संगीत दिलेय, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. गाण्याचे पोस्टर्ससुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलंय.
गाणे जनतेच्या चरणी अर्पण : विशेष म्हणजे हे गाणे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत ऐकवण्यात आलेय. पण त्यापूर्वी गीतकार श्रीरंग गोडबोले, गायक नंदेश उमप यांचा सत्कार करण्यात आलाय. राज्यात मागील काही वर्षांपासून एकनाथांच्या नावानं तोतयागिरी सुरू आहे. अराजकता माजली असून, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नाही. या सर्वांचा विनाश करण्यासाठी आम्ही हे नवरात्रीच्या निमित्ताने गाणे तयार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमची लढाई न्यायालयात सुरू आहे. पण न्यायालयाचे दरवाजे ठोठावत असताना आमचे हात दुखायला लागलेत. पण न्याय मिळत नाही. त्यामुळे जो काही न्याय मिळायचा असेल तो जनतेच्या दरबारात मिळेल, यासाठी आम्ही जनतेच्या दरबारात लढाई लढणार आहोत. तसेच हे गाणे जनतेच्या चरणी अर्पण करतो, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
आई असुरांचा विनाश करणार :आईला जेव्हा हाक मारली जाते, तेव्हा आई भक्तासाठी धावून येते आणि असुरांच्या विनाश करते हे इतिहासात दिसलेले आहे. याही वेळेला ती भक्ताच्या हाकेला धावून येईल आणि असुरांचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांनो हे गाणं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवा. तसेच हे गाणं ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सोशल मीडियाचे टीमकडून सगळीकडे पसरवले जाणार आहे. नवरात्री उत्सवाच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. परत एकदा दसऱ्याला आपण सगळे भेटणार आहोतच. पण आता जनतेच्या दरबारामध्ये ही लढाई सुरू झाली आहे. सर्वांना धन्यवाद देतो आणि असंच प्रेम आणि आपली आपुलकी, माया, आशीर्वाद असू द्या, अशी विनंती करतो, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
सौ सुनार की एक लोहार की...: आम्ही मशालीच्या प्रखर तेजाने महाराष्ट्रात माजलेली अराजकता दूर करण्यासाठी देवीला साकडं घातलं आहे. मला जे काही बोलायचे आहे, ते दसरा मेळावा येथे बोलणार आहे. ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलू दे..., पण मी दसरा मेळाव्यात सर्व विषयावर बोलणार आहे. सौ सुनार की एक लोहार की, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.
हेही वाचा-
महाराष्ट्रातील अराजकता अन् तोतयागिरीचा नायनाट करणार; उद्धव ठाकरेंचा 'गीता'च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल - Uddhav Thackeray New Song - UDDHAV THACKERAY NEW SONG
Uddhav Thackeray New Song : खरं तर राज्यात अराजकता माजली आहे, त्यावर घाव घालण्यासाठी आणि आसूड ओडण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने एक गीत तयार केलेय. राज्यातील तोतयागिरीचा नायनाट करण्यासाठी "असुरांचा संहार कराया, मशाल हाती दे.., सत्वर भूवरी ये गं अंबे..., सत्वर भूवरी ये.." हे गीत तयार केलेय.
Published : Oct 3, 2024, 4:15 PM IST
|Updated : Oct 3, 2024, 4:40 PM IST