ETV Bharat / politics

राहुल गांधींनी वायनाड ऐवजी रायबरेलीची निवड का केली? प्रियंका गांधी निवडणूक लढवण्यामागं काँग्रेसची काय आहे रणनीती? - Rahul Gandhi To Push Congress in UP - RAHUL GANDHI TO PUSH CONGRESS IN UP

Rahul Gandhi To Push Congress in UP : राहुल गांधींनी वायनाडमधून आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी वायनाडची जागा सोडण्यामागं काँग्रेसची नेमकी रणनीती काय? जाणून घेऊया..

Rahul Gandhi To Push Congress in UP
Rahul Gandhi To Push Congress in UP (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 11:46 AM IST

Rahul Gandhi To Push Congress in UP : काँग्रेसच्या नेत्या तथा पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबतची सोमवारी घोषणा केली. राजकारणात प्रवेश केल्यापासून प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 2019 पासून वायनाडचे खासदार म्हणून काम करणाऱ्या राहुल गांधी यांनी बहिणीसाठी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "काँग्रेस पक्षातील आपण सर्वांनी मिळून राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातून खासदार राहतील, असा निर्णय घेतला आहे. ते वायनाडमधूनही निवडून आलेत. तिथले लोक त्यांना चांगलं ओळखतातं. चांगलं समजून घेतात. म्हणूनच आम्ही ठरवलं आहे की, प्रियांका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवतील. हा काँग्रेसच्या विचारपूर्वक केलेल्या रणनीतीचा भाग आहे."

यूपीमध्ये काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न : लोकसभा 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीनं चांगली कामगिरी केली. लोकसभा निवडणुकीनंतर यूपीमध्ये काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं पुन्हा एकदा रायबरेली आणि अमेठीची जागा जिंकली. या दोन्ही जागा काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. मात्र, 2019 मध्ये राहुल गांधींना येथे पराभवाला सामोरे जावे लागले होते.

केरळमधून प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्यामागील कारण म्हणजे काँग्रेस पक्षाला दक्षिणेकडील राज्यावर आपली मजबूत पकड कायम ठेवायची आहे. 2019 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं चांगली कामगिरी केली आहे. मात्र, यावेळी केरळमध्ये भाजपला एक जागा जिंकण्यात यश आलं आहे. प्रियांका गांधी यांच्या माध्यमातून काँग्रेस महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करेल. महिलांचे प्रश्न ते संसदेत मांडू शकतात. त्यामुळं आगामी निवडणुकीत काँग्रेसला महिला अधिक मतदान करतील, असं मानलं जातं. प्रियांका गांधी यांची महिलांमध्ये प्रचंड लोकप्रियता असल्याचं मानलं जातं.

प्रियांका गांधी मोठ्या फरकानं जिंकणार : एआयसीसीचे केरळचे प्रभारी सचिव पी विश्वनाथन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं की, ''प्रियांका गांधी वायनाडमधील पोटनिवडणूक मोठ्या फरकानं जिंकणार आहेत. कारण येथील लोकांचं गांधी कुटुंबावर प्रेम आहे. 2019 आणि 2024 मध्ये राहुल गांधींच्या उमेदवारीमुळं राज्यात पक्षाची ताकद वाढली आहे. खासदार म्हणून त्यांनी येथे खूप काम केलं. राहुल मतदारांशी कौटुंबिक संबंध राखण्यासाठी वायनाडला भेट देत राहती. तर प्रियंका रायबरेली आणि अमेठीशी कौटुंबिक संबंध ठेवतील.''

काँग्रेसची रणनीती काय? यावर एक नजर टाकू.

  • रायबरेली मतदारसंघात विजय मिळवून राहुल गांधींनी यूपीमध्ये पुनरागमन केलं आहे. ही संधी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत वाया घालवायची नाही. केंद्रात सत्तेसाठी यूपीत वर्चस्व राखण गरजेचं आहे. त्यामुळं यूपीची ही जागा पक्षानं कायम ठेवली आहे.
  • काँग्रेसला माहित आहे की, अमेठी आणि रायबरेली जागांच्या माध्यमातून ते यूपीच्या लोकांना विकासकामांची झलक दाखवून त्यांना आकर्षित करू शकतात. अशा स्थितीत राहुल गांधींना रायबरेलीच्या जागेवर टिकवणं आवश्यक आहे.
  • अमेठी आणि रायबरेली या जागा गांधी घराण्याच्या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. 2019 मध्ये अमेठी मतदारसंघातून काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्यामुळं पक्षाला आता पुन्हा कोणतीही तडजोड करायची नाही.
  • 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सहा खासदार विजयी झाले आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर पक्षाला हे यश मिळालं आहे. या निवडणुकीत अमेठी आणि रायबरेली या जागांवर काँग्रेसचा प्रचारही संपूर्ण यूपीमध्ये चर्चेचा विषय होता. यामध्ये प्रियंका गांधींनी आपल्या कुटुंबाबाबत जनतेला केलेल्या भावनिक आवाहनाचं खूप कौतुक झालं. ही भावनिकता पक्षाला जपायची आहे. त्यासाठी राहुल गांधी यांनी वेळोवेळी या दोन्ही जागांना भेट देणं आवश्यक आहे. त्यामुळंच ही जागा राहुल गांधीकडेच ठेवण्यात आली आहे.
  • यूपीच्या राजकारणात योगी आदित्यनाथ, केशव मौर्य यांच्यासह भाजपचे अनेक मोठे नेते आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून फक्त राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दिसत आहेत. याच कारणामुळं राहुल यांच्याकडं यूपीची जबाबदारी देण्यात आली आहे.
  • या लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील पराभवानं भाजपाला मोठा धक्का बसला. काँग्रेस याकडं मोठी संधी म्हणून पाहत आहे. सत्ताविरोधी ही लाट कायम ठेवण्यासाठी राहुल गांधींचं यूपीत असणं आवश्यक मानलं जात आहे.
  • उत्तर प्रदेशातील नेते पक्ष सोडून इतर पक्षांशी हातमिळवणी करत होते. त्यामुळं पक्ष खूपच कमकुवत झाला होता. यूपी निवडणुकीतील काँग्रेसचा हा विजय म्हणजे मोठी संजीवनी आहे. या विजयामुळं काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. यूपीमध्ये काँग्रेस आता मजबूत होऊ शकते. याच कारणामुळं त्यांनी रायबरेलीच्या जागेवर खासदारकी कायम ठेवली आहे.

हेही वाचा

  1. इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करा, लोकसभा सभापती निवडीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया - Maharashtra Breaking News Live
  2. "ओबीसी समाजामध्ये संभ्रम...."; आरक्षणावरुन गोपीचंद पडळकरांचा सरकारला सल्ला - Gopichand Padalkar On Reservation
  3. "उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी"; नारायण राणेंच्या विजयावरून राणे व ठाकरे गटात जुंपली - Nitesh Rane On Uddhav Thackeray

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.