नागपुर Vijay Wadettiwar On Indresh Kumar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. आता या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
रामानं पाय ठेवला, तिथं भाजपचा पराभव झाला : विजय वडेट्टीवार म्हणाले की, ''इंद्रेश कुमार यांनी त्यांच्या मनात जे आलं तेच सांगितलं. त्यांच्यावर दबाव आला असावा, त्यामुळच त्यांनी आपलं विधान नंतर मागं घेतलं. पण अहंकारी कोण आहे? अहंकाराची भाषा कोणी वापरली? '400 पार' बद्दल कोण बोललं होतं? भगवान राम आणण्याबद्दल कोण बोललं? हे संपूर्ण भारताला माहीत आहे. जिथं रामानं पाय ठेवला, तिथं भाजपाचा पराभव झालाय. भारतीय जनता पक्षाचे वाईट दिवस सुरू झालेत. भाजपानं वेळीच सुधारणा न केल्यास आगामी काळात आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आता या लोकांनी अहंकार दाखवायचा प्रयत्न केला तर जनता त्यांना जागा दाखवायला एक सेकंदही लागणार नाही.''
काय म्हणाले होते इंद्रेश कुमार : राजस्थानमधील जयपूरजवळील कानोटा येथे 'रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन सोहळ्यात' इंद्रेश कुमार म्हणाले होते की, "निवडणुकीचा निकाल त्यांची वृत्ती दर्शवतो. पक्षानं आधी रामाची भक्ती केली, त्यानंतर ते अहंकारी झाले. प्रभू रामचंद्रांनी त्यांना 241 वरच रोखलं. मात्र, सर्वात मोठा पक्ष बनवलं. इंद्रेश कुमार यांचा रोख भाजपाकडे होता. याशिवाय ज्यांचा प्रभू रामचंद्रांवर विश्वास नव्हता त्यांना 234 वरच थांबवलं," असं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीवरही निशाणा साधला होता.''
हेही वाचा