ETV Bharat / politics

'वंचित' भाजपाची 'बी टीम' म्हणाऱ्या थोरातांच्या पक्षानं सहा ठिकाणी उमेदवारांना पाठिंबा कसा दिला? रुपवतेंचा सवाल - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असलेल्या उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत ‘वंचित‘ मध्ये प्रवेश केला होता. आता त्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी 'डोअर टु डोअर' प्रचार देखील सुरू केला आहे.

Lok Sabha Election 2024
वंचित बहुजन आघाडी प्रचार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 9:56 PM IST

Updated : May 1, 2024, 10:40 PM IST

प्रतिक्रिया देताना उत्कर्षा रुपवते

शिर्डी (अहमदनगर) Lok Sabha Election 2024 : शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचाराला आता रंगत आलीय. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) या 'डोअर टु डोअर' प्रचारावर भर देत आहेत. 'वंचित' भाजपाची 'बी टीम' म्हणाऱ्या बाळासाहेब थोरातांच्या (Balasaheb Thorat) पक्षानं सहा ठिकाणी उमेदवारांना पाठिंबा कसा दिला असा सवाल रुपवते यांनी विचारला आहे. शिर्डी लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होणार आहे. दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांच्या बरोबरीनं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाल्यानंतर त्यांनीही मतदार संघात गावोगावी जात प्रचार सुरू केलाय.

मतदारांपुढे एक तिसरा पर्याय : शिर्डी लोकसभा मतदार संघातील दोन्ही प्रस्थापित उमेदवारांनी मतदारांना झुलवत ठेवलं. मात्र, आता मतदारांना तिसरा पर्याय आहे. यापूर्वी शिर्डी मतदार संघातून दिग्गज नेते शंकरराव काळे यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता असलेले भीम बडदेंनी दारुण पराभव केला होता. याची आठवण करुन देत विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

वंचित ही भाजापाची बी टीम? : संगमनेर येथील सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी रुपवतेंना पक्षाने पदे दिली. मात्र, त्या निवडणुकवेळी राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटल्यामुळं वंचित ही भाजापाची बी टीम असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर उत्कर्षा रुपवते म्हणाल्या की, मला काँग्रेसने तिकीट दिलं नाही. मात्र, मला निवडणूक लढविण्याची इच्छा असल्यानं मी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना जावून भेटले होते. बाळासाहेब थोरात जर शिर्डीत वंचित भाजपाची बी टीम असल्याचं म्हणत असतील तर, त्यांच्याच पक्षाने सहा ठिकाणच्या उमेदवारांना पाठिंबा कसा दिला? असा प्रश्न उत्कर्षा रुपवते यांनी थोरात यांना विचारला आहे.

हेही वाचा -

  1. ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरे घेणार सभा; उमेदवारी घोषित झाल्यानंतर श्रीकांत शिंदे,नरेश म्हस्केंनी घेतले राज ठाकरेंचे आशीर्वाद - Lok Sabha Election 2024
  2. ठरलं तर! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा 'हुकमी एक्का' लोकसभेच्या रिंगणात - Lok Sabha Election
  3. मोदी-शाहांच्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात स्वाऱ्या; महाराष्ट्र दिनानिमित्त संजय राऊतांची जहरी टीका - Sanjay Raut

Last Updated : May 1, 2024, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.