ETV Bharat / politics

किरण सामंतांची माघार ही नारायण राणे यांनी दम दिल्यामुळेच - आमदार वैभव नाईक यांची टीका - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून (Sindhudurg Ratnagiri Lok Sabha) शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. आता या जागेवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरू असलेल्या वाटाघाटी पूर्ण झालेल्या असून किरण सामंत (kiran samant) यांनी माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Vaibhav Naik On Narayan Rane
आमदार वैभव नाईक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 6:58 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार वैभव नाईक

सिंधुदुर्ग Lok Sabha Election 2024 : सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघावर (Sindhudurg Ratnagiri Lok Sabha) भारतीय जनता पार्टीकडून जोरदार दावा करत शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. मात्र, त्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (kiran samant) यांची आपण मोदींना साथ देणार असल्याची एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. यावर कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी खरमरी टीका करत, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी किरण सामंत यांना दम दिल्यामुळंच त्यांनी माघार घेतल्याचं म्हटलंय.

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी मोर्चा बांधणी : भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावतीनं रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी शिवसेनेकडून आपल्याला उमेदवारी मिळावी असा दावा केलाय. तर दुसरीकडं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी यासाठी मागील काही दिवस वसंत स्फूर्तीवर तसंच सागर बंगला, वर्षा बंगल्यावर बैठकांचा धडाका पाहायला मिळत होता.

...म्हणून किरण सामंत यांनी घेतली माघार : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे. तर दुसरीकडं अद्याप भारतीय जनता पार्टीनं उमेदवार दिला नसल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. या सगळ्यावरती बोलताना आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंत यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर बोलताना सांगितलं की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दम दिल्यामुळं शिवसेना शिंदे गटाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असणारे उमेदवार किरण सामंत यांनी माघार घेतली असल्याचं म्हटलंय.

हेही वाचा -

  1. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत का केला प्रवेश? शिवाजी आढळराव पाटील यांनी उघड केलं गुपित - Shivajirao Adhalrao Patil
  2. वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका दुटप्पी? काय म्हणाले राजकीय विश्लेषक? - Vanchit Aaghadi
  3. शिंदे गटाचे स्टार प्रचारक अडचणीत, प्राथमिक सदस्यत्व सिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश - LOK SABHA ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.