कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. अखेर आता देवेंद्र फडणवीस हे तिसऱयांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. महायुतीच्या शपथविधीसाठी दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले. या शपथविधीसाठी कोल्हापुरातील अर्बन स्टोरी या शोरूमकडून खास देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दिलेल्या भगव्या रंगातील 'मोदी जॅकेट'वर भाजपाचे चिन्ह कमळ रेखांकित केले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना भेट म्हणून त्यांनी एका रात्रीत हे जॅकेट बनवून दिलं.
कसं आहे 'मोदी जॅकेट' : भगव्या रंगामध्ये तयार केलेले हे 'मोदी जॅकेट' आहे. त्यावर भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ रेखांकित करण्यात आलं. तर हे जॅकेट एका रात्रीत बनवण्यात आलं आहे. अस्सल झूट कापडामधील हे जॅकेट फडणवीस यांच्या शपथविधीसाठी कोल्हापुरात बनवण्यात आल्याची माहिती शोरूमचे व्यवस्थापक आशिष शहा यांनी दिली.
सुरज चव्हाण आणि धनंजय पवार याच्यासाठी जॅकेट डिझाईन : अर्बन स्टोरी यांच्याकडून बिग बॉस मराठीमधील स्पर्धक, कोल्हापूरचा रांगडा गडी धनंजय पवार आणि बिग बॉस सीजन 5 चा विजेता सुरज चव्हाण यांच्यासाठीही खास डिझाईन केलेले जॅकेट बनवण्यात आली होती. आताही त्यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी स्पेशल मोदी जकेट तयार केले आहे.
देवेंद्र फडणवीस आणि मोदी जॅकेट : जेव्हा पाहू तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मोदी जॅकेटवरच आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या रंगाचे जॅकेट फडणवीस हे परिधान करत असल्याचं आपण पाहिलं. त्यामुळं फडणवीस आणि जॅकेट यांचं एक जवळचं नात आहे. देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळं त्यांच्यासाठी कोल्हापुरात खास जॅकेट तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा -