ETV Bharat / politics

काय सांगता! ईव्हीएम हॅक करण्यासाठी थेट विरोधी पक्ष नेत्याकडं केली अडीच कोटींची मागणी, नेमका मॅटर काय? - Ambadas Danve - AMBADAS DANVE

Ambadas Danve News : ईव्हीएम हॅक करण्यासंदर्भात अंबादास दानवे यांना अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या संदर्भात एकाला अटक करण्यात आली आहे.

unknown man offered Ambadas Danve to hack EVM machine
अंबादास दानवे (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 9:22 PM IST

अंबादास दानवे यांना अडीच कोटीत ईव्हीएम हॅक करुन देण्याची ऑफर (reporter)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Ambadas Danve News : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ईव्हीएम हॅक करण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपये मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून तो काश्मीर येथे सैन्य दलात कार्यरत असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस आयुक्तांनी केलाय. शिवसेनेच्या (ठाकरे गट) सर्व जागांवर ईव्हीएम मशीनमध्ये चीप टाकून मतदान वाढवून देतो, असं सांगत फसवणूक करण्याच्या इराद्यानं आरोपीनं दानवे यांना संपर्क केला होता. मात्र, असं होणं शक्य नाही हे माहीत असल्यानं, भारतीय नागरिक असल्याचं कर्तव्य आपण बजावलं असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

दानवेंना मागितले अडीच कोटी रुपये : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडं एक तक्रार केली होती. ते म्हणाले होती की, मारोती ढाकणे हा व्यक्ती मला सारखा फोन करून इलेक्शन मॅनेजमेंट करता येतं असं सांगत होता. तो भारतीय सैन्यात मेजर असल्याचं देखील सांगत होता. मॅनेजमेंट करता येते असं म्हटल्यावर, नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती यांच्या मतामध्ये जास्तीत जास्त परिवर्तन होईल असा माझा समज होता. इलेक्शन काळात त्यानं ही गोष्ट सांगितल्यामुळं मी दुर्लक्ष केलं. पण सारखे कॉल येत असल्यानं मी मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय हे बोलण्याचं ठरवलं. त्याच्याशी बोललो तेव्हा मला धक्काच बसला, त्यानं मला मी ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो, माझ्याकडं चीप आहे. सर्वच्या सर्व मतदान केंद्रावर तसं करता येईल. जसं पाहिजे तसं मतदान इथं नाही तर कुठेही करू शकतो, असं तो म्हणाला. त्यासाठी त्याने माझ्याकडं अडीच कोटींची मागणी केली, असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

पोलिसात केली तक्रार : "आरोपी मारोती ढाकणे जे सांगतो ते शक्य नाही, आपल्या डेमोक्रसीमध्ये अनेक यंत्रणा आहे. त्यामुळं या गोष्टी होऊ शकत नाही, असा मला ठाम विश्वास होता, तरी मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. कारण एखाद्या माणसाला जीवनातून उठवनं योग्य नाही. मात्र, हे होऊ शकतं असं म्हणत तो मागे लागला, त्यामुळं मला संशय आला. त्यामुळं मी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली, आणि त्याला रंगेहाथ पकडायचं ठरवलं. त्यानंतर मारोती ढाकणे याला बोलावून दीड कोटींमध्ये व्यवहार ठरवला आणि एक लाख रुपये माझा भाऊ राजू दानवे यांच्या माध्यमातून देत आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं", असं अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितलं.

कर्ज बाजारी असल्यानं केलं कृत्य : अंबादास दानवे यांनी तक्रार दिल्यानंतर मारुती ढाकणे याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान तो सैन्य दलात काश्मीर येथे जवान म्हणून कार्यरत असल्याचं त्यानी सांगितलं. आपल्यावर खूप मोठं कर्ज झालं असून त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी आपण हे सर्व केलं असल्याची माहिती आरोपीनं पोलिसांना दिली. तर, सदरील आरोपीला तांत्रिक ज्ञान नसून फक्त फसवणूक करण्याच्या दृष्टीनं त्यानं अंबादास दानवे यांच्याशी बोलाचाली केली. तो सुट्टीवर असून त्याच्या सुट्टीचा अखेरचा दिवस होता, पैसे घेऊन तो पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार होता. तसंच या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.

हेही वाचा -

  1. मतदानासाठी लाखो चाकरमान्यांची गावाकडं जाण्याची लगबग, पण... - Lok Sabha Election 2024
  2. ईव्हीएमवर 'कमळ' चिन्ह दिसत नसल्यानं आजोबा संतापले; पाहा काय आहे प्रकार - BJP kamal symbol not visible on EVM
  3. लोकसभा निवडणूक 2024: कोल्हापुरात मातब्बरांची लढत; छत्रपती घराण्यासह महाडिक कुटुंबानं बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.