नागपूर Nitin Gadkari Cast his Vote : नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज मतदानाचा हक्क बजावलाय. मध्य नागपूरच्या महाल येथील टाऊन हॉल येथील मतदानकेंद्रात त्यांनी सहकुटुंब मतदान केलंय. नितीन गडकरी हे सलग तिसऱ्यांदा नागपूर लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी त्यांची लढत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्याशी होत आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांनी माजी मंत्री विलास मुत्तेमवार आणि 2019 ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पराभव केला होता.
काय म्हणाले गडकरी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात मतदान केलं. यानंतर बोवताना ते म्हणाले, "आज आपण लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहोत. प्रत्येकानं मतदान करावं, हा आपला मुलभूत हक्क आहे. तसंच कर्तव्य आहे. तुम्ही कोणालाही मत देऊ शकता पण मतदान करणं महत्त्वाचं आहे. मला 101 टक्के विश्वास आहे की मी चांगल्या फरकाने निवडून येईल."
दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांनी कोराडी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मतदान केलं. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पट्टेल यांनीदेखील आज गोंदियामधील मतदान केंद्रावर मतदान केलंय.
पहिल्या टप्प्यात कुठं-कुठं मतदान : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तामिळनाडू (39 जागा), उत्तराखंड (5 जागा), अरुणाचल प्रदेश (2 जागा), मेघालय (2 जागा), अंदमान आणि निकोबार (1 जागा), मिझोराम (1 जागा), नागालँड (1 जागा), पुदुचेरी (1 जागा), सिक्किम (1 जागा), लक्षद्वीप (1 जागा), राजस्थान (12 जागा), उत्तर प्रदेश (8 जागा), मध्य प्रदेश (6 जागा), आसाम (5 जागा), महाराष्ट्र (5 जागा), बिहार (4 जागा). पश्चिम बंगाल (3 जागा), मणिपूर (2 जागा) सोबतच त्रिपुरा, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एका जागेवर आज मतदान होतंय.
हेही वाचा :