ETV Bharat / politics

लोकसभा निवडणूक निकाल 2024 :सत्ता स्थापनेचा दावा करायलाच हवा; उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया - lok Sabha Elections Result 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 10:56 PM IST

Lok Sabha Elections Result 2024 : देशात इंडिया आघाडीला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं देशात बाहेर जाणाऱ्या सरकारला ढकलून लावण्यासाठी सत्ता स्थापनेचा दावा करायलाच हवा अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबई पत्रकार परिषदेत व्यक्त केलीय. काही मतदारसंघांमध्ये गडबड झाल्याची शक्यता असून या ठिकाणी पुन्हा मतमोजणीची मागणी आम्ही करणार आहोत असंही ते म्हणाले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray (ETV BHARAT MH DESK)

मुंबई lok Sabha Elections Result 2024 : लोकसभा निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील सर्वसामान्य माणसांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे आपण अभिनंदन करतो. सत्ताधाऱ्यांना एका बोटाने आपण हरवू शकतो हे सर्वसामान्य जनतेनं दाखवून दिलं आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

सत्ता स्थापनेचा दावा करायलाच हवा : केंद्रात सत्ता स्थापन करण्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ता स्थापनेचा दावा करायलाच हवा त्यासाठी आम्ही उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक घेत आहोत. या बैठकीला देशातील सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. संजय राऊत आणि अनिल देसाई सुद्धा या बैठकीसाठी उद्या रवाना होतील. देशात पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यासाठी ही बैठक असेल. देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सत्ता स्थापन झाली पाहिजे, याच मताचे आम्ही सर्वजण आहोत.

छोट्या घटक पक्षांना संपर्क सुरू : देशात सत्ता स्थापन करण्यासाठी देशातील अन्य छोट्या घटक पक्षांची संपर्क इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सुरू केला आहे. ज्या ज्या व्यक्तींना या सरकारनं त्रास दिला आहे ते सर्व एकत्र येतील आणि हे सरकार उलथून लावतील. चंद्राबाबू नायडू यांना सुद्धा सरकारनं त्रास दिला आहे. नितीश कुमार यांना सुद्धा या सरकारनं त्रास दिला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांना त्रास हवा आहे की, नाही हे त्यांनी ठरवावं. हुकूमशाही आणि जुलमी वृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ज्या ज्या लोकांना भाजपानं त्रास दिला आहे ते सर्व लोक आमच्यासोबत येतील असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलाय.

कोकणचा पराभव अनाकलनीय : कोकणात विनायक राऊत यांचा आणि अनंत गीते यांचा झालेला पराभव हा अनाकलनीय आहे. हा पराभव क्लेषकारक आहे यासंदर्भात आम्ही निश्चितच चिंतन करू कारण कोकणची जनता ही नेहमीच आमच्यासोबत आहे. या ठिकाणी काही गडबड झाल्याची शंका येऊ शकते. त्याबाबत आम्ही निश्चितच विचार करत आहोत. तर उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातही अमोल कीर्तिकर यांचा झालेला पराभव आम्हाला मान्य नाही. यासंदर्भात निवडणूक मतदान आणि मत मोजणी प्रक्रियेलाच आम्ही आव्हान देणार आहोत, असंही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

हेही वाचा -

  1. राज्यात महाविकास आघाडीमुळं महायुतीचं टेन्शन वाढलं; तुमच्या मतदारसंघाचा खासदार कोण? वाचा संपूर्ण लिस्ट - maharashtra lok sabha 2024 winner list
  2. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी, अमोल कीर्तिकरांचा निसटता पराभव - Lok Sabha Election Results
  3. पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव; अख्ख मुंडे कुटुंब उतरलं होतं प्रचारात तरीही हरली जागा - Beed Lok Sabha Election Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.