मुंबई Amsha Padvi Joins Shinde Group : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून ओळखले जाणारे, ठाकरे गटाचे नेते आणि नंदुरबार जिल्ह्यातील विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच उद्धव ठाकरेंची साथ सोडत, शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय.
पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश : एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड पुकारल्यानंतर आमश्या पाडवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नव्हती. मात्र, अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमश्या पाडवी यांनी शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेतलंय. आमश्या पाडवी यांच्यासह नंदुरबारमधील ठाकरे गटाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी देखील आज (17 मार्च) शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमश्या पाडवी यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंत्री दादा भुसे आणि मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते.
कोण आहेत आमश्या पाडवी? : आमश्या पाडवी यांनी 1995 पासून कोवली विहीर गावाचे सरपंच बनून स्थानिक राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दोन वेळा अक्कलकुवा पंचायत समितीचं सभापतीपद भूषवलंय. तसंच अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक पदही त्यांनी भूषवलंय. गेल्या अकरा वर्षापासून सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आदिवासींच्या विविध प्रश्नांवर आक्रमक मोर्चे काढणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. तेव्हापासून ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दोन वेळा त्यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढवलीय. परंतू दोन्ही वेळा त्यांच्या पराभव झाला. मात्र आक्रमक आदिवासी चेहरा असल्यानं शिवसेनेच्या वतीनं त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं. विधान परिषदेत आदिवासींचा बुलंद आवाज म्हणून आमश्या पाडवी यांना ओळखलं जातं.
हेही वाचा -
- Vinayak Raut : "रवींद्र वायकर ठरले ईडीचे बळी, तर भास्कर जाधवांचं मन...", नेमकं काय म्हणाले विनायक राऊत? पाहा व्हिडिओ
- Uddhav Thackeray : अबकी बार 'चंद्रहार'! पळपुटे, नामर्द पळून जातायत आणि मर्द पक्षात येतायत; उद्धव ठाकरेंची गर्जना
- विरोधी पक्षातील नेत्यांचे भाजपात प्रवेश होताना नवनीत राणांना पक्षप्रवेश का नाही? खासदार अनिल बोंडे यांनी स्पष्टचं सांगितलं