ETV Bharat / politics

मणिपूरबाबत भागवत बोलल्यानंतर आता तरी मोदी मणिपूरला जाणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल - Uddhav Thackeray On PM Modi - UDDHAV THACKERAY ON PM MODI

Uddhav Thackeray On PM Modi : काश्मीर आणि मणिपूरमध्ये घडणाऱ्या घटनांवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय. सरसंघचालकांचं विधान पंतप्रधान किती गांभीर्यानं घेणार माहिती नाही. आता तरी ते मणिपूरला जाणार का? असा सवाल करत ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केलीय.

Uddhav Thackeray On PM Modi
उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 4:10 PM IST

मुंबई Uddhav Thackeray On PM Modi : मागील आठ दिवसात तिसऱ्यांदा काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केलाय. याला जबाबदार कोण? जरी केंद्रात तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं असलं तरी काश्मीरमधील हल्ले काही थांबत नाहीत? काश्मीरमध्ये 370 कलम काढल्यानंतर सुद्धा लोकांचे जीव जात आहेत. याकडं केंद्र सरकार गांभीर्यानं का बघत नाही. त्यामुळं मोदींना पीएम पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदींवर (PM Narendra Modi) केलीय.

प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे (ETV BHARAT Reporter)

मोदी गांभीर्यानं घेणार का? : मणिपूर मुद्यावर एक वर्षानंतर सरसंघचालक मोहन भागवत बोलले हे काही कमी नाही. एक वर्षानंतरही मणिपूर अजून धुमसतंय. परंतु केंद्राकडून यावर कोणताच तोडगा काढला जात नाही. मात्र आता मोहन भागवत बोलल्यानंतर तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांभीर्यानं घेणार का? गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. तसंच देशातील मतदारांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहे. लोकांनी तसंच मतदारांनी भाजपाला नाकारलं आहे. यामुळं आता तरी भाजपा सुधारणार आहे का? की केवळ विरोधकांना संपवणार आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.

अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन : शिवसेना (ठाकरे गटाचे) मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर पार पडलं. मागील 3 टर्म मी पदवीधर मतदारसंघातून काम करत आहे. पाच वेळा पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून आम्हाला नेहमी चांगली मतं मिळाली आहेत. गेल्या वेळेस 98 टक्के मतं मिळाली होती. मी माझ्या मुंबई पदवीधर मतदारसंघात काय काम करणार याची माहिती या संकल्पपत्रात दिलीय, असं मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांनी म्हटलं. यावेळी जाहीरनाम्याचं प्रकाशन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केलाय.

माझं पदवीचं सर्टीफिकिट खरं : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई पदवीधर या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व मतदार येथे सुशिक्षित आहेत. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा प्रमोद नवलकर यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांच्या कामाची पद्धत आणि भाषेवरील प्रभुत्व चांगलं आणि प्रभावी होतं. शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं आहे. हे नातं आणखी घट्ट करु या. मतदानाच्या दिवशी सुट्टी नाही. त्यामुळं कामाला जायच्या आधी मतदान करुन कामावर जा आणि आम्हाला आशीर्वाद द्या असं आवाहन आणि विनंती उद्धव ठाकरेंनी मतदारांना केलीय."अनिल परब तुम्ही मला माझे मतदार म्हटल्याबद्दल धन्यवाद, कारण माझं पदवीचं सर्टीफिकेट खरं आहे," असं मिश्किल वक्तव्य ठाकरेंनी केलंय. यानंतर एकच हशा पिकला.

मविआसोबत समझोता : विधानपरिषद निवडणुकीबाबत नाशिक आणि कोकण येथे काँग्रेस किंवा मविआतील तुमचे मित्रपक्ष इच्छुक होते. किंवा त्यांच्याकडून काही नाराजी आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता, ते म्हणाले की, आम्ही वेळ जाऊ नये म्हणून आधीच अर्ज भरले होते. आम्ही महाविकास आघाडीसोबत विधानपरिषद निवडणुकीसाठी समझोता केला आहे. त्यामुळं आता काही नाराजीचं कारण नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपानं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली; संघाच्या मुखपत्रातून भाजपाला 'घरचा आहेर' - RSS Mouthpiece Criticize To BJP
  2. चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, पवन कल्याण उपमुख्यमंत्री - Chandrababu Naidu
  3. विधान परिषद निवडणूक 2024 : महाविकास आघाडीत ठिणगी, नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंवर व्यक्त केली नाराजी, काय आहे वादाचं कारण ? - Tensions in MVA Over MLC polls

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.