ETV Bharat / politics

भाजपाची हुकूमशाही आता उलथून लावायची, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल - datta gorde join thackeray group

Uddhav Thackeray Attack On BJP : पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) दत्ता गोर्डे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज (6 फेब्रुवारी) मातोश्रीवर शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी दत्ता गोर्डे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केलं.

Uddhav Thackeray criticized BJP after datta gorde join thackeray group
दत्ता गोर्डे यांची पक्षात एन्ट्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 7:16 PM IST

दत्ता गोर्डे यांची पक्षात एन्ट्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल

मुंबई Uddhav Thackeray Attack On BJP : पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज (6 फेब्रुवारी) ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळं हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. या प्रवेशानंतर बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. तसंच "भाजपाची हुकूमशाही आता उलथून लावायची", असंही ते म्हणाले.

काय म्हणाले उध्दव ठाकरे? : यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मागील चार-पाच दिवसांपासून मी कोकण दौऱ्यावर होतो. या दौऱ्यात मी कुटुंबसंवाद ही यात्रा केली. मला पाहायचं होतं की, माझ्यासोबत माझे कुटुंब आहे की नाही? कोरोनाकाळात 'मी आणि माझे कुटुंब' ही मोहीम आम्ही राबवली होती. आता महाराष्ट्र आणि देशावर संकट आले असताना हे कुटुंब माझ्यासोबत आहे की नाही? हे मला बघायचं होतं म्हणून मी हा दौरा केला," असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपूर्वी दोन चक्रीवादळं आली होते. पण आता महाराष्ट्रातून भगवे वादळ दिल्लीच्या तख्तावर धडकणार आहे आणि हुकूमशाहीची चिरफाड करणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली.

हुकूमशाहीला आता गाडून टाकायचे : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज दत्ता गोर्डे आणि त्यांचे सहकारी शिवसेना (ठाकरे गट) या पक्षात आलेले आहेत. मी त्यांचे स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. सध्या देशात बोललं जातंय की, इंडिया आघाडी आहे. महाविकास आघाडी आहे. पण पर्याय कुठे आहे. जी देशात हुकूमशाही माजलीय. त्या हुकूमशाहीला
आपल्याला गाडून टाकायचंय. तसंच आपल्या पक्षात विविध जाती-धर्मातील लोक प्रवेश करत आहेत. भाजपाचेही लोक आपल्याकडे येतायत त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे."

मन की बात नको जन की बात करा : "देशात पंतप्रधान मन की बात करतात. पण जन की बात करत नाहीत. मागील दहा वर्षात जो भाजपाने देशात कारभार केलाय, पण त्यांचा कारभार आता उघडा पडलाय. म्हणून लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. भाजपाचे, पंतप्रधान मोदींचे रथ अडवले जात आहेत. त्यांना शिव्या दिल्या जात आहे. तुम्ही संकट काळात माझ्यासोबत आला आहात. त्यामुळं मी तुमचं स्वागत करतो, आणि असं म्हणतात की संकट काळात देशाचं महाराष्ट्रानं प्रबोधन केलं आहे. आताच्या या दुसऱ्या संकटकाळात सुद्धा महाराष्ट्रच देशाचे प्रबोधन आणि नेतृत्व करणार आहे. तुम्ही सर्व मराठवाड्यातून आलेले आहात. मराठवाडा ही संतांची भूमी असून संतांच्या भूमीमध्ये गद्दारांना थारा नाही."

कोण आहेत दत्ता गोर्डे : आक्रमक आणि जनतेच्या संपर्कातील तळागळातील कार्यकर्ते अशी दत्ता गोर्डे यांची ओळख आहे. गोर्डे यांनी 2019 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मागील पंधरा वर्षांत नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्षपर्यंतचा राजकीय प्रवास दत्ता गोर्डे यांनी केला आहे. मध्यंतरी ते भाजपामध्येही होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर दत्ता गोर्डे काही दिवस अजित पवार यांच्या गटातही होते. यानंतर त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

हेही वाचा -

  1. कोणीही आयुष्याचा आणि सत्तेचा अमरपट्टा घेवून आलेला नाही-उद्धव ठाकरे
  2. महायुती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरू-उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
  3. ठाकरे गटाला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 कार्यकर्त्यांचा 'मनसे'त प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.