मुंबई Uddhav Thackeray On Modi Government : "लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections आचारसंहिता लागू असताना वर्तमानपत्रातून सरकारी जाहिरातींचा भडीमार सुरू आहे. राज्य सरकारचं मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांचे फोटो त्यात प्रसिद्ध होत आहेत. कायद्यासमोर सर्व समान म्हणणाऱ्या निवडणूक आयोगानं याची दखल घेऊन प्रत्येकाच्या खात्यातून खर्च वसूल करावा," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय. मंगळवारी भायखळा येथील पक्षाच्या शाखेला भेट दिली असता, त्यांनी मोदी आणि राज्य सरकारवर टीका केली.
मोदींवर केली टीका : "देशात खऱ्या अर्थानं लोकशाही राबवायची असेल तर लोकसभा निवडणुका जाहीर होताच, राजीनामा द्यायला हवा. पंतप्रधान हा पक्षाचा नव्हे देशाचा असतो. पंतप्रधान हे भाजपाचा प्रचार करणार असतील तर त्यांनी सगळ्या पक्षांचा प्रचार करावा. तरच 'मोदी का परिवार' आम्ही मानू. यावेळी 'निवडणूक आल्यानंतर 'सबका साथ' आणि निवडून आल्यावर 'सबको लाथ आणि दोस्तोंका विकास'," असं म्हणत ठाकरे यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली.
सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली : सध्या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याच्या मागणीवरून ही ठाकरेंनी खासदार अरविंद सावंत यांच्या पत्राचा दाखला देत, खासदार राहूल शेवाळे यांची 'पत्र वीर' अशी खिल्ली उडवली. "स्वतःला डबल इंजिन, ट्रिपल इंजिन म्हणणाऱ्यांच्या सोबतीला अशोक चव्हाणांचं चौथे इंजिन लागलं. सरकारला भ्रष्टाचाराची चार चाके लागली आहेत," असं म्हणत शिवसेना फुटीचा उल्लेख करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लोकप्रतिनिधी, नेत्यांवर ठाकरेंनी हल्ला चढवला. एकेकाळी माझगावमध्ये शिवसेना फोडीचा प्रयत्न झाला. साध्या शिवसैनिकानं त्यांना आडवा केल्याची आठवण ठाकरेंनी करून दिली.
महाराष्ट्राची अस्मिता संपवली जात आहे : "गद्दारांना गाडण्याची धमक शिवसैनिकांच्या रक्तात आहे. परंतु, यावेळी गद्दारी नव्हे तर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला. सत्तेच्या खुर्चीसाठी काहींनी बूट चाटले. महाराष्ट्र लुटण्यासाठी त्यांना शिवसेना संपवायची आहे. त्यासाठी त्यांनी आईच्या कुशीवर वार केला. परंतु, ज्या शिवसेनेने महाराष्ट्राची, मराठीची अस्मिता आणि हिंदुत्वाचं रक्षण केलं, ती ताकद त्यांच्याच माध्यमातून संपवली जात आहे. खोक्यात बंद झालेल्यांनी डोळ्यांवर नोटांची झापड लावली आहेत. मात्र, शिवसेना संपणार नाही, संपू शकत नाही," अशा शब्दांत ठाकरेंनी ठणकावले.
हेही वाचा -
- ठरलं! ठाकरे गटाची 15 उमेदवारांची यादी जाहीर होणार, ठाकरे गट किती जागा लढवणार? - Lok Sabha Elections
- कमी कार्यकाळ बाकी असल्यानं अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय - Akola West Assembly By Election
- ...म्हणून शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये 'मातोश्री'वर झाली बैठक; नितेश राणेंचा गंभीर आरोप - Nitesh Rane On MVA