रत्नागिरी Uday Samant on Narayan Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (Sindhudurg lok Sabha) उमेदवारीवरून सध्या भाजपा आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) दावे-प्रतिदावे सुरू आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेता नारायण राणे यांनी केलेल्या ट्विटवरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राणेंना टोला लगावला आहे. 'ट्वीट केलं म्हणजे जागा त्यांची झाली असं होत नाही', उद्या मी देखील ट्विट करू शकतो ही जागा शिवसेनेचीच, पण याच्यातून आपापसांत वाद, हेवेदावे वाढतील. त्यामुळं जी जागा शिवसेनेच्या ताब्यातील आहे, ती शिवसेनेला मिळाली पाहिजे, असा टोला उदय सामंत यांनी भाजपा नेते नारायण राणे यांना लगावलाय. आज ते रत्नागिरीत बोलत होते.
...या जागेवर आमचाच दावा : यावेळी पुढे उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या लोकसभा जागेवर शिवसेनेचाच दावा आहे. शिवसेनेचे ते उमेदवार आमच्यासोबत आले नाहीत, याचा अर्थ या जागेवरचा दावा आम्ही सोडलेला नाही, या जागेवर आमचाच दावा आहे. पण याबाबत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. आचार संहितेपूर्वी राज्यातला महायुतीचा लोकसभेसाठीचा फॉर्मुला ठरेल. युती मानसन्मानाने होईल आणि सीट शेअरिंग देखील चांगलं होईल असं देखील सामंत यावेळी म्हणाले.
गोव्याच्या जागेवरही आम्ही दावा करणार : गोव्यातील लोकसभेची एक जागा अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळं गोवाचा पुढील दोन दिवसात मी दौरा करणार आहे आणि त्या जागेवर आम्ही दावा करणार आहोत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर पुन्हा एकदा दावा सांगितल्यानंतर उदय सामंत यांनी प्रमोद सावंत यांना टोला लगावलाय.
हेही वाचा -