ETV Bharat / politics

पैलवान निवडणुकीच्या आखाड्यात; हजार पैलवान आले मदतीला - Murlidhar Mohol - MURLIDHAR MOHOL

Murlidhar Mohol : मूळचे पैलवान असलेले आणि महायुतीकडून पुणे लोकसभेच्या (Lok Sabha Elections) आखाड्यात उतरलेले मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो पैलवान पुण्यात शड्डू ठोकणार आहेत. आपल्यातीलच एका पैलवानाला थेट लोकसभेसाठी संधी मिळाल्यानं विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार यावेळी पैलवानांनी केलाय.

Murlidhar Mohol
मुरलीधर मोहोळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 8:11 PM IST

प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ

पुणे Murlidhar Mohol : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) वारं वाहू लागलंय. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी लढत होणार आहे. दोघांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. आजपर्यंत आपण पैलवानांना मैदानात कुस्ती करताना पाहिलं. पण हेच पैलवान आत्ता राजकारणात येत आहेत. पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील जवळपास एक हजारहून अधिक पैलवानांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा दिलाय. पुढील काळात हे पैलवान मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील देणार पाठिंबा : पुणे शहरातील कोथरूड येथे शनिवारी एक हजारहून अधिक पैलवान एकत्र येत मेळावा घेतला. या मेळाव्यात मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्याचं ठरलं आहे. मेळाव्याबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "पुणे शहराची एक संस्कृती आहे. पुणे शहर तसेच जिल्ह्यानं कुस्ती या खेळात एक वेगळं स्थान तयार केलं आहे. मी देखील एक पैलवान आहे. जिथं मी सराव केला अशा या लाल मातीशी निगडित असलेले हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील उपस्थित होते. आम्हाला लाल मातीतील ऋणानुबंध टिकवायचे आहेत. म्हणून आजच्या नियोजनाच्या बैठकीत एक हजार पैलवानांनी पाठिंबा दिला. तसेच पुढील नियोजन त्यांच्या पद्धतीनं करणार आहेत."

पैलवानांना 200 पानांची डायरी भेट : मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, "खेळ आणि राजकारण हे खूप वेगळं असून राजकारणाला खेळात कधीही आणणार नाही. कुस्ती हा माझा खेळ आहे. राजकारणात अनिश्चितता असते. खेळातील ही कुस्ती आणि राजकारणातील कुस्ती दोन्ही मारणार." पैलवानांच्या नियोजन बैठकीत मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित असलेल्या पैलवानांना 200 पानांची डायरी दिली. ही डायरी देताना ते म्हणाले की, "इथे बसलेल्या प्रत्येकाचं पुणे लोकसभा मतदारसंघात मित्रमंडळी तसेच नातेवाईक आहेत. प्रत्येकानं जर डायरीतील 200 लोकांना जोडून दिलं तर अनेक लोकांना जोडले जावून काही न करता जास्तीत जास्त मतदान मिळेल."

हेही वाचा -

  1. मनस्थितीवर परिणाम झाल्यामुळं अशी वक्तव्य; सुनील तटकरेंची विजय शिवतारेंवर टीका - Sunil Tatkare on Vijay Shivtare
  2. 'गेला आदित्य कुणीकडे?' गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे राजकारणातून गायब, विरोधकांचं टीकास्त्र - Aaditya Thackeray
  3. विजय शिवतारेंना पक्षाकडून थेट अल्टीमेटम; युतीधर्म न पाळल्यास कारवाईचा बडगा? नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? - Shambhuraj Desai On Vijay Shivtare

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.