ETV Bharat / politics

सरकार भपकेबाज; विचारसरणी समजते, एसटीत हवाई सुंदरी आणण्यावरून रोहित पवार संतापले - ST Corporation Chairman - ST CORPORATION CHAIRMAN

ST Corporation Chairman : एसटी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर भरत गोगावले विमानात असणाऱ्या एअर होस्टेसच्या धर्तीवर तोट्यात असलेल्या एसटी बसेसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ आणणार आहेत. परंतु त्यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. अशा प्रकारच्या निर्णयावरून सरकारची विचारसरणी समजत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

rohit pawar
रोहित पवार (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 6:12 PM IST

मुंबई ST Corporation Chairman :- विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर भरत गोगावले विमानात असणाऱ्या एअर होस्टेसच्या धर्तीवर तोट्यात असलेल्या एसटी बसेसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ आणणार आहेत. परंतु त्यावरून आता विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. अशा प्रकारच्या निर्णयावरून सरकारची विचारसरणी समजत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

सरकार भपकेबाज असल्याचा आरोप : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले विराजमान झाल्यानंतर त्यांनी ही मोठी घोषणा केली. विमानातील हवाई सुंदरीप्रमाणे शिवनेरी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा प्रवाशांच्या तिकीट दरावर भार टाकला जाणार नाही, प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवेचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न असल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नाही, अनेक बसेसना गळती लागली आहे. एसटीतून प्रवास करणाऱ्या सामान्य जनतेला चांगली सेवा मिळत नाही, बसच्या खिडक्या तुटक्या आहेत. सामान्य लोकांचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे जीवन सुंदर करण्याऐवजी सरकार लहरीपणाने अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. सरकार भपकेबाज असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

2029 ला भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करणार : देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर काही बैठका घेतल्या, त्यात त्यांनी 2029 ला भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे सांगितलं. महाराष्ट्रात आता असे घडेल की जे देशाला दिशा दाखवेल, असंही अमित शाहांनी सांगितलं. त्यावर रोहित पवार म्हणाले की, गृहमंत्री जे बोलतात ते अगदी योग्य असून, राज्यातील स्वाभिमानी जनतेने लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देऊन 31 खासदार निवडून दिले, तशाच प्रकारची ताकद विधानसभेलादेखील राज्यातील स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीला देईल, असे त्यांना वाटत आहे.

...तर शिंदे व अजितदादांनी योग्य निर्णय घ्यावा: खरं तर अमित शाह आणि भाजपाला वाटत आहे की, त्यांचे सरकार राज्यात येणार नाही, त्यामुळे नेते फोडा, कार्यकर्ते फोडा आणि काहीही करा, पण राज्यात सत्ता आणा, असे ते सांगत आहेत. राज्यातील निकाल हा देशात संदेश घेऊन जाणार आहे. त्यामुळे तुमच्यासोबत असलेल्या मित्रपक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण काय संदेश देऊ इच्छितो. लोकसभेला तुमचा वापर होईल आणि विधानसभेला वापर करून 2029 ला स्वबळावर सत्तेत येऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये जर स्वाभिमान बाकी असेल तर त्यांनी अमित शाह यांनी दिलेल्या संदेशाचा अभ्यास करून योग्य प्रकारे निर्णय घ्यावेत, असंही रोहित पवार म्हणालेत. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्यासाठी महायुतीला हद्दपार करून महाविकास आघाडीला निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -

  1. अखेर सहा दिवसांनी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन; स्थानिकांनी केला विरोध - Akshay Shinde Body Buried
  2. अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश - Akshay Shinde Encounter Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.